गिरवलीत घर फोडले
By Admin | Updated: December 8, 2015 00:04 IST2015-12-07T23:17:56+5:302015-12-08T00:04:12+5:30
वाशी / ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथील माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़

गिरवलीत घर फोडले
वाशी / ईट : भूम तालुक्यातील गिरवली येथील माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरवली येथील बाळासाहेब रावसाहेब मोटे हे रविवारी रात्री घरात झोपले होते़ सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़ मोटे झोपलेल्या खोलीचा बाहेरून दरवाजा चोरट्यांनी बंद केला़ त्यानंतर शेजारील रूममधील पेटीत ठेवलेले ६० हजार रूपयांचे गंठण, २० हजाराचे कानातील सोन्याचे दागिने, रोख ५ हजार रूपये लंपास केले़ रात्रीच्या सुमारास शेजारील रूममधून आवाज येत असल्याने मोटे यांच्या पत्नीने बाळासाहेब मोटे यांना जागे केले़ दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून लावल्याचे दिसून आले़
त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती दिली़ शेजारी बाहेर येईपर्यंत चोरट्यांनी तेथून पळ काढला होता़ याबाबत बाळासाहेब मोटे यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तपास सपोउपनि जाधव हे करीत आहेत़