शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाहतुकीवर कारवाईसत्र सुरू !

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अवैध वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच परिवहन विभागासह वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र हाती घेतले आहे़ दोन्ही विभागाकडून गुरूवारी

उस्मानाबाद : जिल्ह्यातील अवैध वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच परिवहन विभागासह वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र हाती घेतले आहे़ दोन्ही विभागाकडून गुरूवारी जवळपास ४६ वाहनांवर कारवाई करण्यात आली़उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात अवैध विद्यार्थ्यांची वाहतूक, अवैध प्रवाशी वाहतुकीला ऊत आला होता़ वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या वाहतुकीबाबत ‘लोकमत’ने बुधवारी ‘जिल्ह्यात अवैध वाहतूक जोमात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेवून परिवहन विभागाने सकाळी सात वाजल्यापासूनच कारवाई सत्र सुरू केले़ या विभागाने दिवसभरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ११ लहान व एका मोठ्या बसवर कारवाईचा बडगा उगारला़ यातील एका बसची कागदपत्रे सुरळीत असून, इतर वाहनांची कागदपत्रे व स्कूलबससाठी लागणारे नियम पाळण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ या बसेसवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे़ तर वाहतूक शाखेने शहरात सिग्नल मोडणे, दुचाकीवर तिघे बसून जाण्यासह वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या जवळपास ३५ वाहनचालकांवर कारवाई करून दंड करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.कारवाईचा ‘फार्स’ नकोपरिवहन विभाग व वाहतूक शाखेने कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ या दोन्ही विभागांनी सुरू केलेली कारवाईची मोहीम केवळ फार्स ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे़ जिल्ह्यात बोकाळलेली अवैध प्रवाशी वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांसह मालकांना परिवहन विभागाने यापूर्वी आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या़ मात्र, अनेकांनी या सूचनांचे पालन केले नसल्याचे दिसत आहे़ प्रारंभी स्कूलबसवर कारवाई करण्यात येत असून, लवकरच अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरूध्दही कारवाईची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़