जन्मदात्या आईने दिले पोटच्या मुलांना गरम झारीचे चटके
By Admin | Updated: October 3, 2016 00:34 IST2016-10-03T00:28:06+5:302016-10-03T00:34:38+5:30
वाळूज महानगर : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन मुलांना एका इसमाच्या मदतीने मारहाण करून त्यांना गरम झारीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना शाळेतील एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे शनिवारी उघडकीस आली.

जन्मदात्या आईने दिले पोटच्या मुलांना गरम झारीचे चटके
वाळूज महानगर : जन्मदात्या आईनेच पोटच्या दोन मुलांना एका इसमाच्या मदतीने मारहाण करून त्यांना गरम झारीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना शाळेतील एका शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे शनिवारी उघडकीस आली. आई व त्या इसमास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
पार्वती शंभू गिरी (रा. खैराक मठिया, ता.रसाडा, जि. बलिया उ. प्रदेश, ह. मु. जयभवानी चौक, बजाजनगर) ही आपल्या रवी ११ वर्षे व राज ९ वर्षे या दोन मुलांसह बजाजनगरात नागेश चव्हाण या इसमासोबत राहते. ती नागेशबरोबर एका कंपनीत कामाला आहे. मुले बजाजनगरातील सनराईज इंग्लिश स्कूलमध्ये शिकतात. शनिवारी रवी व राज हे सकाळी शाळेत आले असता त्यांच्या चेहऱ्यावर कशाने तरी चटके दिल्याचे लाल डाग दिसून आले. याविषयी शिक्षिका ठाकरे यांनी विचारपूस केली असता शुक्रवारी आई व तिच्यासोबत राहणारा नागेश यांनी रात्री बेल्टने मारहाण केली. रडत असताना गप्प बसा म्हणून तापलेल्या गरम झारीने तोंडावर व शरीरावर अन्य ठिकाणी चटके दिल्याचे सांगितले. त्यांच्या शरीरावर मारहाणीचे वळ व झारीने दिलेले चटक्याचे लाल डाग स्पष्ट दिसत होते.