क्लासेसनंतर आता रुग्णालये रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:16 IST2017-09-28T00:16:38+5:302017-09-28T00:16:38+5:30
ल्या दोन दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेणाºया आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ तीन रुग्णालयांवर धाड मारुन रुग्णसंख्येसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़

क्लासेसनंतर आता रुग्णालये रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कोचिंग क्लासेसची झाडाझडती घेणाºया आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी आपला मोर्चा खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ तीन रुग्णालयांवर धाड मारुन रुग्णसंख्येसह इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली़
सोमवारी बाबानगर भागातील चार कोचिंग क्लासेसवर आयकर विभागाच्या पथकाने धाड मारली होती़ त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती़ गेले दोन दिवस या कोचिंग क्लासेसच्या कागदपत्रांची तपासणी सुरु होती़ नोटबंदीच्या काळातील व्यवहार आणि कमी विद्यार्थीसंख्या या दोन मुख्य विषयांवर आयकरच्या अधिकाºयांचा रोख होता़ त्यानंतर बुधवारी आयकर विभागाने आपला मोर्चा शहरातील खाजगी रुग्णालयांकडे वळविला़ शिवाजीनगर, बोरबन आणि शाहीर अण्णाभाऊ साठे चौक भागातील एका अशा तीन रुग्णालयांवर धाड टाकण्यात आली़
या रुग्णालयातील रुग्णांची संख्या, इमारत, करभरणा याबाबतीत गेल्या अनेक दिवसांपासून कर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून होते़ त्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़