रुग्णालय फलकावरील पदाधिकारी ‘अपडेट’ होईनात !

By Admin | Updated: February 16, 2015 00:51 IST2015-02-16T00:48:29+5:302015-02-16T00:51:39+5:30

उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला लावण्यात आलेल्या माहिती फलकावर सन २००९ मध्ये स्थापन केलेल्या रूग्ण कल्याण

Hospital officials 'update' to be held! | रुग्णालय फलकावरील पदाधिकारी ‘अपडेट’ होईनात !

रुग्णालय फलकावरील पदाधिकारी ‘अपडेट’ होईनात !


उस्मानाबाद : जिल्हा रूग्णालयात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला लावण्यात आलेल्या माहिती फलकावर सन २००९ मध्ये स्थापन केलेल्या रूग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीवर जुनेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यरत असल्याचे दिसत आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांसह इतर अधिकारी बदलून गेल्यानंतरही माहितीफलक बदलण्यात आला नसून, या प्रकारामुळे जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांचीही पदाधिकाऱ्यांबाबत दिशाभूल होताना दिसत आहे़
जिल्हा रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यानंतर रूग्णकल्याण समितीच्या नियमक मंडळ सदस्य किंवा कार्यकारी समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची वेळोवेळी आवश्यकता भासते़ या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी मंडळ व नियमक मंडळातील पदाधिकाऱ्यांची नावे असलेला फलक लावण्यात आला आहे़ यातील नियमक मंडळाच्या अध्यक्षपदी तत्कालीन जिल्हाधिकारी के़ एम़ नागरगोजे तर सह अध्यक्षपदी तत्कालीन मुख्याधिकारी एस़ एल़ हरिदास तर सदस्य म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी अजय चारठाणकर, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आऱ आऱ हश्मी, सदस्य सचिव म्हणून ए़ आऱ धाकतोडे, जिल्हा परिषदेचे तत्कालीन आरोग्य सभापती संजय दूधगावकर यांची नावे कायम आहेत़ तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ ए़आऱधाकतोडे व सदस्य म्हणून तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ आऱआऱहाश्मी यांची नावे कायम आहेत़ एकीकडे जिल्हा रूग्णालयाचा कारभार ढेपाळलेला असताना दुसरीकडे रूग्ण कल्याण समितीच्या कार्यकारी मंडळ व नियमक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावेही नामफलकावर जुनेच आहेत़ जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा रूग्णांसह नातेवाईकांना फटका बसत असून, किमान हा नामफलक तरी बदलावा, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Hospital officials 'update' to be held!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.