‘सर्वोपचार’मधील रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By Admin | Updated: September 15, 2015 14:42 IST2015-09-14T00:45:46+5:302015-09-15T14:42:29+5:30

एकाच शस्त्रक्रियागृहात, एकाच दिव्याच्या मदतीने दिवसभरातील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत़ त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत़

The hospital in 'All-Tech' ignored the administration | ‘सर्वोपचार’मधील रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

‘सर्वोपचार’मधील रुग्णालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


लातूर : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाचे चार शस्त्रक्रियागृह असून, यातील तीन शस्त्रक्रियागृहातील शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे दिवे बंद असल्याने तसेच वातानुकूलित यंत्र बंद पडले आहेत़ परिणामी एकाच शस्त्रक्रियागृहात, एकाच दिव्याच्या मदतीने दिवसभरातील शस्त्रक्रिया केल्या जात आहेत़ त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत़ तरीही सर्वोपचार प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असून, मागील दोन महिन्यांपासून रुग्णांची फरफट सुरु आहे़
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे लातूर जिल्ह्यातील रुग्णांसह आंध्र व कर्नाटकामधून येणाऱ्या रुग्णांचे आधारस्थान बनले आहे़ त्यामुळे दिवसाकाठी हजार रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी होते़ तर दिवसाकाठी ५० ते १०० रुग्ण विविध आजाराच्या समस्येमुळे उपचारासाठी दाखल होतात़ या रुग्णांना अल्प दरात रुग्ण सेवा मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्ण सतत येथे उपचारासाठी दाखल होतात़ शासनही वेगवेगळ्या योजनेअंतर्गत या रुग्णांच्या आरोग्यासाठी नवनवीन योजना जाहीर करत आहे़ त्या योजनांचा लाभ शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे़ पण शासकीय रुग्णालयाच्या उदासीन प्रशासन आणि लालफितीचे धोरण यामुळे हजारो रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागत आहे़ असाच प्रकार, सर्वोपचार रुग्णालयात होत आहे़ शल्यचिकित्सा विभागांतर्गत सुसज्ज असे चार शस्त्रक्रियागृह सुरु करण्यात आले आहेत़ यामध्ये तीन शस्त्रक्रियागृह व एक उपयुक्त लघुशस्त्रक्रियागृह असे एकूण चार शस्त्रक्रियागृह आहे़ यातील तीन शस्त्रक्रियागृह केवळ शस्त्रक्रियेसाठी लागणारे दिवे बंद असल्यामुळे बंद आहे़ एका शस्त्रक्रियागृहात एका दिव्यावर शस्त्रक्रियागृह सुरु आहे़ याच शस्त्रक्रियागृहात तीन निर्जंतुकीकरण मशीन आहेत़ यातील दोन मशीन बंद असून, एकाच मशीन सुरु आहे़ हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिष्ठातांच्या लक्षात आणून देण्यासाठी २७ वेळा तक्रारी दिल्या आहेत़ तरीही त्याकडे व्यवस्थापन गांभीर्याने पाहत नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: The hospital in 'All-Tech' ignored the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.