गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना
By Admin | Updated: July 9, 2014 00:34 IST2014-07-08T22:53:51+5:302014-07-09T00:34:19+5:30
राजूर : गेल्या खरीप हंगामात झालेल्या गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. धामणगाव येथील निम्मे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.

गारपीटग्रस्तांना अनुदान मिळेना
राजूर : गेल्या खरीप हंगामात झालेल्या गारपिटीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. धामणगाव येथील निम्मे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. तातडीने नव्याने सर्वे करून वंचित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेल्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला होता. शासनाने गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मंजूर केले. बँकेत शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या याद्या लागल्या आहेत. मात्र यामधे बहुतांश शेतकऱ्यांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सध्या शेतकरी मोठया प्रमाणात आर्थिक अडचणीत आहेत. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी पावसाचा कोणताच मागमूस नसून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काहींनी धूळपेरणी केली ती पावसाअभावी वाया गेल्याने आर्थिक नुकसान झाले. गारपीटग्रस्तांचा नव्याने सर्वे करून तातडीने वंचित शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी गुलाब राठोड, सुभाष काफरे, अशोक दरेकर, दत्ता काफरे, लताबाई चव्हाण, धुरपदाबाई राठोड, यशोदाबाई राठोड, बालाजी दरेकर, हिम्मतराव जाधव, विजू राठोड, मनोहर काफरे, शोभाबाई राठोड यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
नव्याने यादी करा
परिसरातील गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शासनाने नव्याने पंचनामे करुन अनुदान वाटप करावे. बहुतांश शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नसून, अनुदानही मिळालेले नाही.