गारपीट मदतीचे वाटप

By Admin | Updated: June 23, 2014 00:26 IST2014-06-22T22:45:37+5:302014-06-23T00:26:40+5:30

जाफराबाद : तालुक्यातील २९ गावांचे गावनिहाय गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे.

Horticulture Assistance | गारपीट मदतीचे वाटप

गारपीट मदतीचे वाटप

जाफराबाद : तालुक्यातील २९ गावांचे गावनिहाय गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचे काम सुरू आहे. पहिला व दुसरा हप्ता मिळून एकूण ९ हजार ३६० पात्र लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ३८ लाख ४६ हजार रुपये मदत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाफराबाद शाखेमध्ये जमा आहे. उपलब्ध मदतीपैकी पहिल्या हप्त्यात १ कोटी ७९ लाख ४२ हजार रुपये वाटप झाले आहे.
गारपीट अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचा फायदा ३ हजार ५२७ शेतकऱ्यांना झाला असून, दुसऱ्या हप्त्यामध्ये २ कोटी ५९ लाख ४ हजार रुपये ५ हजार ८३३ शेतकऱ्यांना होणार आहे. याकरिता शासनाच्या वतीने गारपीट अनुदान तरतूद करून देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा व्यवहार संगणकीकृत झाल्याने याचा फायदादेखील लाभार्थ्यांना तात्काळ मिळत आहे. ऐन खरीप पेरणीच्या वेळेस अनुदान मिळाल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
पहिल्या हप्त्यामध्ये विरखेडा भालकी, सावंगी, खासगाव, पिंपळखुटा, कुंभारी, नळविहरा, निमखेडा, टाकळी, सावरखेडा, वरखेडा, रेपाळा, खामखेडा येथील ३ हजार ५२७ लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले आहे.
दुसऱ्या हप्त्यामध्ये रूपखेडा, गोकुळवाडी, आरदखेडा, बोरगाव मठ, बोरी खुर्द, हरपाळा, चिंचखेडा, हिवराबळी, बोरगाव बु. बोरखेडी, जवखेडा ठेंग, गोंधनखेडा, मेरखेडा, देऊळगाव उगले, जानेफळ पंडित आदी गावांचे अनुदान वाटपाचे काम सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये ५ हजार ८३३ पात्र लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. अनुदान वाटपाच्या कामी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रकाश राऊत, प्रमुख भाग चौकसनीस माधवराव भोपळे, संजय उबरहंडे यांचे सहकार्य लाभत आहे. (वार्ताहर)
कर्ज योजनेचा लाभ घ्यावा
शासनाच्या पीक कर्ज योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात आले असताना सदरील कर्ज लाभधारक शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी भरणा केल्यास अशा शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख पीक कर्जमाफी योजनेचा फायदा होऊ शकतो.
पीक कर्जाची वसुली ७ कोटी १९ लाख रुपये असून, तालुक्यात ३ हजार ८४७ कर्जदार आहेत. सदरील शेतकऱ्यांना जवळपास ३ टक्के कर्जमाफीचा फायदा घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Horticulture Assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.