भीषण आगीत ‘श्री चित्रमंदीर’ खाक

By Admin | Updated: April 23, 2016 23:51 IST2016-04-23T23:43:38+5:302016-04-23T23:51:21+5:30

उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागातील ‘श्री चित्रमंदीर’ या चित्रपटगृहाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़

The horror is called 'Shri Chitmandir' Khak | भीषण आगीत ‘श्री चित्रमंदीर’ खाक

भीषण आगीत ‘श्री चित्रमंदीर’ खाक


उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागातील ‘श्री चित्रमंदीर’ या चित्रपटगृहाला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ ही आग इतकी भीषण होती की आतील पडद्यासह स्टीलचे साहित्यही जळून खाक झाले़ ही आग कोणत्या कारणाने लागली, हे अद्याप अस्पष्ट असून, या आगीत मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे़
उस्मानाबाद शहरातील समता नगर मधील गोरे कॉम्प्लेक्समध्ये राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे यांचे ‘श्री चित्रमंदीर’ हा चित्रपटगृह आहे़ या चित्रपटगृहात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली़ अचानक लागलेली आग शेजारी असलेल्या रूग्णालयातील व बाजूच्या कॉलनीतील नागरिकांच्या लक्षात आली़ पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले होते़ परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावून घेतले़ अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी येवून आग विझविण्याचा प्रयत्न केला़ मात्र, घटना लक्षात येईपर्यंत आणि अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत चित्रपटगृहातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते़ या दोन्ही अग्निशमनच्या गाड्यांनी आग अटोक्यात आणली़ आग अटोक्यात आणल्यानंतरही आतमध्ये गरम झळा कायम असल्याने कोणाला प्रवेश करता येत नव्हता़ या आगीत चित्रपट गृहातील पडदा, मशनरी, पिओपी, खुर्चा, साऊंड सिस्टीम, यासह इतर स्टिलचे, लोखंडी साहित्यही जळून खाक झाले़ या घटनेबाबत विश्वनाथ शिंदे यांच्या माहितीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The horror is called 'Shri Chitmandir' Khak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.