घोडके यांनी जिद्दीने केली अपंगत्वावर मात

By Admin | Updated: December 3, 2014 01:15 IST2014-12-03T01:01:21+5:302014-12-03T01:15:23+5:30

गजानन वानखडे , जालना ‘हे ज्ञानाची पवित्रता.. ज्ञानाची हाती’ असे ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानासारखे ज्ञानच पवित्र आहे, असा वसा घेत वयाच्या पाचव्या वर्षांपासून

Hooligans overcome their disabilities with stubbornness | घोडके यांनी जिद्दीने केली अपंगत्वावर मात

घोडके यांनी जिद्दीने केली अपंगत्वावर मात


गजानन वानखडे , जालना
‘हे ज्ञानाची पवित्रता.. ज्ञानाची हाती’ असे ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ज्ञानासारखे ज्ञानच पवित्र आहे, असा वसा घेत वयाच्या पाचव्या वर्षांपासून आलेल्या अपंगत्वाला न डगमगता जिद्दीने मात करत गेल्या तीस वर्षांपासून शहरात ट्यूशन्स घेवून संसाराचा गाडा हाकत आहेत. शहरातील चंद्रकात कडूबा घोडके हे अपंगव्यक्तीसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.
औरंगाबाद जिल्हातील दुधड येथील चंद्रकांत घोडके मामाकडे शिकायला शहरात आले . येथेच स्थायिक झाले. औरंगाबाद येथे बीकॉम झाल्यानंतर नौकरी करण्यापेक्षा मुलांना शिकवून आपण आपला संसार सुरू केला. आजही घोडके हे अपंगांना मिळणारा कोणताही शासकीय लाभ घेत नाहीत. गेल्या तीस वर्षांत त्यांच्या क्लासमधून अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर, विविध क्लासवन अधिकारी तयार केल्याने मला समाधान आहे. सर्वसामान्य माणूस जे सुख भोगत असतो, त्याहीपेक्षा कितीतरी पट मी माझ्या जीवनात सुख मिळविले आहे. पैसा तर कमावलाच. त्यापेक्षा माजी विद्यार्थी मला आदराने ओळख देतात त्याचे मला जास्त समाधान आहे. ४० हजार विद्यार्थ्यांना शिकवून ते आपल्या पायावर उभे आहेत.
आपल्याला आलेल्या अपंगत्वाचे केव्हाही वाईट न वाटत सतत मेहनतीवर भर दिल्यास तुम्ही जीवनात काहीपण मिळवू शकता, असा ठाम विश्वास घोडके यांनी व्यक्त केला. यात माझ्या पत्नीने मला पावलोपावली साथ दिल्यानेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. मला दोन मुले, एक मुलगी आहे. बायकोने कोणतीही तक्रार न करता ती कायम माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे मला मुलांवर जास्त लक्ष देण्याची गरज पडली नाही. आजही आमचे नाते पती-पत्नीचे नसून एक मित्रत्वाचे आहे. वयाची ५५ वर्षी पूर्ण केली आता माझा मोठा मुलगा अंबड येथे क्लास घेतोय. ज्ञानानेच मला सर्व काही दिले .त्यामुळे तुम्ही अपंग आहात हे गौण गोष्ट आहे. मेहनत कराल तर तुम्हाला सर्व काही मिळते.४
घनसावंगी तालुक्यातील विठ्ठल भास्कर चव्हाण हे जन्मताच अपंग आहेत. गावात काहीच काम करता येत नसल्याने अंगात जिद्द असल्याने गेल्या दीड वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पानाची छोटीशी टपरी टाकून आपला संसार चालवत आहेत. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे.तिन्ही मुलांना चांगल्या शाळेत शिकवित आहे. काम असते अपंगव्यक्तीने रडत बसण्यापेक्षा मेहनत करावी, असे चव्हाण यांनी सांगितले. दैवाला दोष न देता ज्या परिस्थितीत आपल्याला जन्मला घातले, त्याला स्वीकारून पुढे जावे, असे चव्हाण धैर्याने सांगतात.

Web Title: Hooligans overcome their disabilities with stubbornness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.