शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत गुंडांचा धुडगूस; औरंगाबादच्या उद्योग क्षेत्रात दहशतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 19:42 IST

MIDC Aurangabad : या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे.

ठळक मुद्देभोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटककामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आले

औरंगाबाद : रेल्वे स्टेशन औद्योगिक वसाहतीतील भोगले ऑटोमोटिव्हच्या व्यवस्थापकीय संचालकांना दोन दिवसांपूर्वी रविवारी (दि. ८ ऑगस्ट) काही गुंडांनी कंपनीत घुसून मारहाण केली. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात पोलिसांनी तिघांना विविध कलमांखाली अटक केली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व तेथील कामगारांच्या जबाबातून आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली. (An atmosphere of terror in the industrial sector of Auranabad )

या घटनेस ४८ तासही उलटत नाहीत तोच मंगळवारी (दि. १०) रात्री वाळूज एमआयडीसीतील जोगेश्वरी शिवारातील श्रीगणेश कोटिंग कंपनीचे व्यवस्थापक शिरीषकुमार राजेभोसले (रा. नक्षत्रवाडी) हे कंपनीतून दुचाकीने घरी परतत असताना, १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेभोसले यांचा डावा हात मोडला असून डोळ्याजवळ मोठी जखम झाली. छातीला व शरीराला मुका मार लागला. या कंपनीत कंत्राटी कामगार पुरविण्याचा ठेका देण्याच्या कारणावरून विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याचे राजेभोसले यांचे म्हणणे आहे.

एमआयडीसीत गुंडगिरी वाढली; कंत्राट देण्याच्या कारणावरून व्यवस्थापकाला रस्त्यात अडवून मारहाण

या घटनांमुळे दहशतीखाली आलेले उद्योजक व त्यांच्या संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन, गुंडांना आवरा, अन्यथा उद्योगांना येथून आपले बस्तान हलवावे लागेल, असा इशाराच दिला आहे. सीआयआयचे अध्यक्ष रमण अजगावकर, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चटर्जी, मसिआचे उपाध्यक्ष अनिल पाटील, अखिल अब्बास, रवी माछर, मानसिंग पवार, संदेश झांबड आदींची या पत्रकार परिषदेला उपस्थिती होती. शिवाय ज्येष्ठ उद्योजक राम भोगले, सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीतशहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीत घडलेल्या या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोगले ऑटोमोटिव्ह प्रकरणात अटकेतील तिघांना सहज जामीन मिळणार नाही, अशीही कलमे आहेत. आणखी काही आरोपींची ओळख पटविण्यात आली असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. शहरात कुणाचीही गुंडगिरी पोलीस खपवून घेणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला. तर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही, उद्योग क्षेत्रात गुंडगिरी सहन केली जाणार नाही असे सांगून, जिल्ह्यात उद्योग क्षेत्र वाढत असताना वातावरण खराब करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत, तो सर्व मोडून काढण्यात येईल, असा इशारा दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी