‘म्हाडा’त सलग सहा दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:06 IST2016-01-17T00:01:33+5:302016-01-17T00:06:20+5:30
औरंगाबाद : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांत चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. चोरट्यांनी बंद घर आणि दुकाने फोडण्यास सुरुवात केली आहे.

‘म्हाडा’त सलग सहा दुकाने फोडली
औरंगाबाद : नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरातील वेगवेगळ्या भागांत चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. चोरट्यांनी बंद घर आणि दुकाने फोडण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी रात्री मूर्तिजापूर भागात म्हाडा कॉलनीतील सहा दुकाने फोडली. विशेष म्हणजे जानेवारीतील १५ दिवसांमध्ये चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांत २५ ठिकाणी धुमाकूळ घातला.
गजबजलेला सिटीचौक भाग, शहागंज, कामगार चौक, नारेगाव, पडेगाव, छावणी, मूर्तिजापूर, ज्योतीनगर, गजानन महाराज मंदिर चौक इ. ठिकाणची दुकाने फोडण्यात आली. रस्त्यावर पोलिसांची गस्त असल्याचे वारंवार सांगण्यात येते; परंतु चोरांचा बंदोबस्त होत नसल्यामुळे पोलिसांच्या दबदब्याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मूर्तिजापूर, म्हाडा कॉलनीतील सुशील जानराव निंबाळकर यांच्या लॉण्ड्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी जुने जॅकेट, ५०० रुपयांची चिल्लर आणि ७०० रुपयांच्या नोटा, असा १,७०० रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरटे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी शेजारी असलेली आणखी पाच दुकाने फोडली.