शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमधील ऑनर किलिंगवर अहवाल देण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:50 IST

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पोलिस महासंचालकांसह पोलिस आयुक्तांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : परजातीय मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून बहिणीला दरीत ढकलून हत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. ही घटना संतापजनक व तितकीच मानवी मूल्यांवर आघात करणारी आहे. या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करून दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करा, असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक व शहराच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

सोमवारी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने समाजमन हादरून गेले. नम्रता गणेश शेरकर (१७, रा. शहागड) या मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध जुळण्याची माहिती कुटुंबाला समजली होती. त्यातून कुटुंबामध्ये मोठे वाद सुरू होते. या प्रेमप्रकरणापासून मुलीला लांब नेण्यासाठी तिच्या वडिलांनी वळदगाव येथे राहणाऱ्या लहान भावाकडे तिला आणून सोडले होते. तिला समजावून सांगण्याच्या बहाण्याने तिचा चुलत भाऊ हृषीकेश याने तिला सोमवारी दुपारी खवड्या डोंगरावर नेत खोल दरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला.

ही मुलींच्या हक्कांची, स्वातंत्र्याची पायमल्ली- मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाने यासंदर्भाने पत्र जारी केले. त्यात या गंभीर घटनेबद्दल आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी संताप व्यक्त करीत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ही घटना म्हणजे मुलीच्या हक्कांची आणि सन्मानाची पायमल्ली आहे.- प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोप निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करून ती वेळेत पूर्ण करा.- आयोगाला दोन दिवसांत एफआयआर प्रत आणि तपशीलवार तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर