देवीच्या आराधनेबरोबर कन्यारत्नाचा सन्मान
By Admin | Updated: October 2, 2014 00:36 IST2014-10-02T00:24:57+5:302014-10-02T00:36:36+5:30
श्रीपाद सिमंतकर ,उदगीर येथील हिंगुलंबिका देवी माता नवरात्र महोत्सव समिती वतीने गेल्या ६ वर्षांपासून कन्यारत्नांचा सन्मान केले जाते़

देवीच्या आराधनेबरोबर कन्यारत्नाचा सन्मान
श्रीपाद सिमंतकर ,उदगीर
येथील हिंगुलंबिका देवी माता नवरात्र महोत्सव समिती वतीने गेल्या ६ वर्षांपासून कन्यारत्नांचा सन्मान केला जात आहे़एक ते दीड वर्षाच्या कन्यांना कोजागिरी पौर्णिमेला पालकांसह सन्मानित केले जाते़ हा उपक्रम भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने राबविण्यात येत असून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे़
शासनाच्या वतीने स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विविध उपक्रम करुन जनजागृती करण्यात येत आहे़ गेल्या काही वर्षांपासून सेवाभावी संस्थांनीही स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे़ याच हेतूने येथील भावसार क्षत्रीय समाजाच्या वतीने कन्यारत्न असलेल्या पालकांचा गौरव करण्यात येत आहे़
त्यामुळे हा उपक्रम इतर मंडळांसाठीही आदर्शवत ठरत आहे़ १५ आॅगस्ट २०१३ नंतर जन्मलेल्या भावसार क्षत्रिय समाजातील मुलींना कन्या रत्न सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे़ ३ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहनही समाजाच्या वतीने करण्यात आले आहे़
प्रत्येक समाज व समाजातील घटकांनी सामजिक जाणिवा ठेवून अशा प्रकारचे उपक्रम केल्याशिवाय उल्लेखनीय व सकारात्मक कार्य घडणार नाही़ त्यामुळे अनोख्या पध्दतीने देवीची आराधना करण्याचा हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे़