भूकंपग्रस्त किल्लारीतील ३९४ जणांना घरांची अद्यापही प्रतीक्षा
By Admin | Updated: November 5, 2016 01:43 IST2016-11-05T01:12:51+5:302016-11-05T01:43:40+5:30
किल्लारी १९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर किल्लारी हे गाव अजूनही वंचित आहे.

भूकंपग्रस्त किल्लारीतील ३९४ जणांना घरांची अद्यापही प्रतीक्षा
ाूर्यकांत बाळापुरे किल्लारी
१९९३ च्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर किल्लारी हे गाव अजूनही वंचित आहे. भूकंपानंतर जगभरातून किल्लारीच्या विकासासाठी आलेल्या तब्बल १२५० कोटी रुपयांच्या निधीतून म्हणावे तसे पुनर्वसन झाले नाही. गेल्या २३ वर्षांपासून गावातील अंतर्गत रस्ते, गटारी, बसस्थानक यासह इतर महत्त्वाचे विकासाचे प्रश्न अद्यापही कायम आहेत. शिवाय, वारंवार होणाऱ्या भूकंपासंदर्भात माहिती देणारी यंत्रणा या भूकंपप्रवण क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात आली नाही.
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावे या भूकंपाने उद्ध्वस्त झाली. जगभरातील विविध देशांकडून किल्लारीच्या पुनर्वसनासाठी १२५० कोटींची मदत मिळाली. मात्र या मदतीतून म्हणावा तसा विकास साधता आला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या भागाचा चंदीगडसारखा विकास करण्याचे आश्वासन दिले होते