दिवाळीच्या सुट्ट्या चार दिवसांनी वाढल्या

By Admin | Updated: November 18, 2015 00:39 IST2015-11-18T00:30:11+5:302015-11-18T00:39:23+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील शाळांना २६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी निमित्त सुट्ट्या देण्यात आल्या होत्या़ ९ ते २६ नोव्हेंबर असा सुट्टयांचा कालावधी होता़

Holidays of Diwali rose up to four days | दिवाळीच्या सुट्ट्या चार दिवसांनी वाढल्या

दिवाळीच्या सुट्ट्या चार दिवसांनी वाढल्या


लातूर : लातूर जिल्ह्यातील शाळांना २६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी निमित्त सुट्ट्या देण्यात आल्या होत्या़ ९ ते २६ नोव्हेंबर असा सुट्टयांचा कालावधी होता़ परंतु आता त्यात लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदल केला असून, चार दिवसाच्या सुट्टयांचा वाढविल्या आहेत़ त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु होतील़ प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची त्यावर स्वाक्षरी झाली असून, सीईओंच्या स्वाक्षरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़
लातूर जिल्ह्यात दिपावळीसाठी १८ दिवसांच्या सुट्टयांचा जाहीर होत्या़ २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांना या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या़ मात्र शिक्षक काँग्रेस संघटनेसह अन्य संघटनांनी दिपावळीसाठी २१ दिवसाच्या सुट्टयांचा देण्यात याव्यात अशी मागणी केली होती़ या मागणीसाठी शिक्षक काँग्रेस संघटनेचे राज्याध्यक्ष कालिदास माने यांनी पाठपुरावा केला होता़ अखेर जिल्हा परिषदेने ही मागणी तत्वत: मान्य केली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत या सुट्ट्या मिळणार आहेत़ प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणीच्या या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ २७, २८ आणि ३० नोव्हेंबर अशा तीन दिवसांच्या सुट्टयांचा अतिरिक्त वाढवून मिळाल्या आहेत़
मध्ये २९ नोव्हेंबर रोजी रविवार आल्याने चार दिवसाच्या सुट्ट्या वाढल्या आहेत़ शिक्षण विभागाने अधिकृतरित्या या सुट्टया जाहीर केल्या नसल्या तरी बुधवारी अधिकृतरित्या या सुट्टयांचा जाहीर केल्या जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले़

Web Title: Holidays of Diwali rose up to four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.