सिल्लोड मध्ये चिनी वस्तु ची होळी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 19:45 IST2016-10-27T19:45:32+5:302016-10-27T19:45:32+5:30

दीपावली या समस्त भारतियांच्या महत्वाच्या सनानिमित्ताने नागरिकांनी स्वदेशी वस्तुंचाच वापर करावा दहशद वादाला ख़त पाणी घालणाऱ्या चीन या देशाच्या वस्तू खरेदी करू नये

Holi a Chinese item in Silode .... | सिल्लोड मध्ये चिनी वस्तु ची होळी....

सिल्लोड मध्ये चिनी वस्तु ची होळी....

सिल्लोड : दीपावली या समस्त भारतियांच्या महत्वाच्या सनानिमित्ताने नागरिकांनी स्वदेशी वस्तुंचाच वापर करावा दहशद वादाला ख़त पाणी घालणाऱ्या चीन या देशाच्या वस्तू खरेदी करू नये या साठी गुरुवारी(दि.27) रोजी राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या व धर्म जागरण समितीच्या वतीने सिल्लोड शहरात चीनी वास्तुची होळी करण्यात आली
गुरुवारी दुपारी 3 वाजता शहरातील डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौकात धर्मजागरण समितीचे तालुका अध्यक्ष मनोज मोरेल्लु यांच्या नेतृत्वाखाली चीनी फटाके लाइटिंग आकाश दिवे यांची जाहिर पने होळी करण्यात आली
या आन्दोलनाबाबत माहिती देतांना धर्मजागरणचे तालुका अध्यक्ष मनोज मोरेल्लु यांनी सांगितले की सध्या भारत पाकिस्तान या दोन देशा दरम्यान तनाव असून कश्मीर प्रश्न धूमसत ठेऊन भारताला जेरिस अन्याचे पाकिस्तानचे धोरण आहे. चीन पाकिस्तानशी मैत्री करुण पाकपुरस्कृत दहशदवादाला ख़त पाणी घालत आहे
या साठी प्रत्येक देश भक्त भारतीय आणि चीनी वस्तु वर बहिष्कार टाकून स्वदेशीचा आंगिकार करावा या बाबत ची जनजागृति व्हावी यासाठी दीपावली आधी हे आंदोलन केल्याचे मोरेल्लु यांनी सांगितले
या वेळी राहुल बनकर, महेश फरकाडे, दिनेश राठोड, राहुल फरकाडे, अक्षय पाटिल, राहुल पाडळे, अमोल कुमावत, चंद्रकांत कुमावत, रावसाहेब शिरसाठ, विशाल खेरे, संतोष काकडे, सचिन दांडग़े, आकाश कुमावत, संजय काकडे, सोनू आहिरराव, सुनील महेता आदि सह नागरिक उपस्थित होते.

Web Title: Holi a Chinese item in Silode ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.