लाकडांनी भरलेला टेम्पो ताब्यात
By Admin | Updated: December 27, 2016 23:55 IST2016-12-27T23:54:20+5:302016-12-27T23:55:29+5:30
येणेगूर : कोराळ साठवण तलावाच्या पाळुवरील तोडलेली झाडे टेम्पोसह मुरुम पोलीसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतली

लाकडांनी भरलेला टेम्पो ताब्यात
येणेगूर : कोराळ साठवण तलावाच्या पाळुवरील तोडलेली झाडे टेम्पोसह मुरुम पोलीसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतली. कोराळ सरपंचाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत कोराळच्या सरपंच विद्या विष्णू भगत यांनी २५ डिसेंंबर रोजी मुरुम पोलीस ठाण्यात साठवण तलावावरील ३५ झाडे अनधिकृतरित्या तोडून टेम्पो (क्रं. एम.एच.०४/एजी ५०२६) मध्ये टाकून नेत असल्याची तक्रार दिली होती. याची दखल घेत येणेगूर दूरक्षेत्रचे पोना दिगंबर सूर्यवंशी यांनी तोडलेल्या झाडांचे तुकडे भरलेला टेम्पो ताब्यात घेवून येणेगूर दूरक्षेत्र येथे उभा केला. यासंदर्भात मुरुम पोलिसांनी उमरगा वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती दिल्यानंतर वनअधिकारी विजय दौंड यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व मुरुम पोलिसांना बाभळीची झाडे तोडण्यास वनखात्याची परवानगी लागत नसल्याची व ती जागा पाटबंधारे खात्याची असल्याचे त्या खात्याने कारवाई करावी असा अभिप्राय दिला. यानंतर येणेगूर दूरक्षेत्रचे पोहेकॉ विजयानंद साखरे यांनी उपविभागीय सिंचन व पाटबंधारे कार्यालय जकापूर कॉलनी यांच्याकडे माहिती देवून पुढील कारवाई संदर्भात विचारणा केली आहे. पण तेथील अधिकारी बाहेरगावी असल्याने कार्यालयाकडून पोलिसांना फक्त पोहोंच प्रत मिळाली.