शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संदीपान भूमरेंचे होर्डिंग जाळले; मराठा आरक्षणासाठी तरुणांचा सरकारविरोधात संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 19:46 IST

होर्डिंग खाली काढून युवकांनी रविवारी जाळून टाकले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पैठण:मराठा आरक्षणासाठी रविवारी तोंडोळी (ता. पैठण) येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा फोटो असलेले होर्डिंग व स्वतःचे मतदान कार्ड जाळून युवकांनी राज्य व केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला. लोहगाव येथे होणाऱ्या एका खासगी कार्यक्रमाचे होर्डिंग तोंडोळी परिसरात लावण्यात आले होते, हे होर्डिंग खाली काढून युवकांनी रविवारी जाळून टाकले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या झंझावाती राज्यव्यापी दौऱ्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पैठण तालुक्यातील काही गावात राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

रविवार(दि.२२ ऑक्टोंबर)  रोजी सकाळी लोहगाव ता पैठण येथे एका वॉटर पार्कचे उदघाटन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार होते. या  कार्यक्रमाचे लोहगाव परिसरातील विविध रस्त्यावर होर्डिंग लावण्यात आलेले होते. या होर्डिंगवर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आलेले होते.

मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश करु देणार नाही अशी भूमिका घेत तोंडोळी येथील युवकांनीमतदानावर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी तोंडोळी येथे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा फोटो असलेले होर्डिंग व स्वतःचे मतदान कार्ड जाळून संतप्त युवकांनी घोषणाबाजी करत तिव्र शब्दात राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. तसेच मराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण