ऐतिहासिक नळदुर्ग किल्याची दुरवस्था...

By Admin | Updated: November 20, 2014 00:47 IST2014-11-20T00:42:17+5:302014-11-20T00:47:18+5:30

पांडुरंग पोळे , नळदुर्ग राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेला नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्याच्या

Historical Naldurg Fort Relocation ... | ऐतिहासिक नळदुर्ग किल्याची दुरवस्था...

ऐतिहासिक नळदुर्ग किल्याची दुरवस्था...


पांडुरंग पोळे , नळदुर्ग
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेला नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे. मात्र पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्याच्या मूळ अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्याचे चित्र किल्याचा फेरफटका मारला असता दिसून येते.
नळदुर्ग येथील किल्याकडे स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून पाहिले जाते. हैद्राबाद-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी राज्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटकांची वर्दळ असते. मात्र किल्याच्या देखभाल दुुरुस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने किल्याची आज प्रचंड दुरवस्था झाली आहे. मध्यंतरी किल्याच्या देखभालीसाठी कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र त्यानंतरही दुरुस्तीची अनेक कामे अर्धवट असल्याचे चित्र आहे.
अनेक बुरुज तसेच महत्वाच्या तटभिंतीची डागडूज करणे गरजेचे असतानाही त्याकडे कानाडोळा झाल्याने अनेक महत्वाचे भाग भूईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्याच्या दुरुस्तीसाठी निधी देताना किल्याच्या देखभालीची जबाबदारी मात्र टाळली जात असल्याने ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशी केविलवाणी अवस्था या ऐतिहासिक ठेव्याची झाली आहे. १२५ एकर एवढ्या प्रचंड मोठ्या भुभागावर असलेल्या या किल्याच्या देखभालीसाठी अवघा एक किल्लेदार नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळेच प्रेक्षनिय स्थळावर लावलेले माहिती फलक, सुरक्षा रेलिंग चोरट्यांनी लंपास केले आहेत. किल्याचे प्रवेशद्वार मूळ स्थितीतील दरवाजासारखे करण्यासाठी शासनाने लाखोचा निधी दिला. मात्र प्रवेशद्वाराचे हे कामही अपूर्ण असल्याचे दिसून येते.

Web Title: Historical Naldurg Fort Relocation ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.