छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांची तब्बल २५ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वास आली आहे. शुक्रवारी जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा हडको एन १२ येथील स्वामी विवेकानंद उद्यानात दाखल झाला. येथील नियोजित चबुतऱ्यावर पुतळा बसविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. लवकरच या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. चिकलठाणा एमआयडीसी, टीव्ही सेंटरमार्गे उद्यानात शोभायात्रेने पोहोचेपर्यंत ४ तास लागले.
महापौरांकडून पूजनदीड वर्षापासून आयुक्त जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने पुतळ्याच्या कामाला गती मिळाली होती. चिकलठाणा येथील मडिलगेकर आर्ट गॅलरीत हा पुतळा साकारण्यात आला. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी दुपारी २:३० वाजता पुतळ्याची पाहणी करून पूजन केले. यानंतर क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याला उघड्या ट्रकमध्ये ठेवून हडकोच्या दिशेने नेण्यात आले.
पुतळा पाहण्यासाठी गर्दीमहात्मा बसवेश्वरांचा पुतळा हडकोतील जैस्वाल हॉल येथे आणण्यात आला. येथे त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. वाजत गाजत पुतळा टीव्ही सेंटरमार्गे स्वामी विवेकानंद उद्यानाच्या बाजूला असलेल्या नियोजित जागेत रात्री ८ वाजता शोभायात्रा पोहोचली. त्यानंतर पुतळा चबुतऱ्यावर उभा करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शोभायात्रेत आर्कि. सचिन संगशेट्टी, नगरसेवक सचिन खैरे, विश्वनाथ स्वामी, वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वर खर्डे, गुरुपाद पडशेट्टी, शिवा गुळवे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शहरवासीयांची उपस्थिती होती.
Web Summary : After 25 years, a grand statue of Basaveshwara reached Chhatrapati Sambhajinagar's Swami Vivekananda Garden. The statue's installation is underway, with unveiling soon to follow after a celebratory procession.
Web Summary : 25 वर्षों के बाद, बसवेश्वर की एक भव्य प्रतिमा छत्रपति संभाजीनगर के स्वामी विवेकानंद उद्यान पहुंची। प्रतिमा की स्थापना जारी है, और जल्द ही एक उत्सवपूर्ण जुलूस के बाद अनावरण किया जाएगा।