शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक साफसफाई; दोन दिवसांत १३६४ मालमत्तांवर मनपाचा बुलडोझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:26 IST

मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत १३६४ मालमत्तांवर कारवाई; महापालिका, पोलिसांची शहरात ऐतिहासिक कामगिरी

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ किरकोळ वादातून १९ जून रोजी एका तरुणाचा खून झाला. या एका कारणानंतर पेटून उठलेल्या पोलिसांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे २० जून रोजी महापालिकेला या भागातील तब्बल २२९ अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात पाडायला भाग पाडले. पोलिसांचे बळ मिळताच महापालिकेने मुकुंदवाडी ते केम्ब्रिजपर्यंत रस्ता २०० फूट रुंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शनिवार आणि रविवारी दोन दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूची तब्बल ११३५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.

शहर विकास आराखड्यानुसार महावीर चौक ते सेव्हन हिल या रस्त्याची रुंदी ४५ मीटर दर्शविण्यात आली आहे. सेव्हन हिल ते केम्ब्रिज चौकापर्यंत रस्ता ६० मीटर म्हणजे जवळपास २०० फूट आहे. विकास आराखड्यानुसार रस्त्याची अंमलबजावणी एवढ्या लवकर होईल, असे स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते. खुनाच्या घटनेनंतर पोलिस आणि महापालिका प्रशासन अक्षरश: पेटून उठले. महापालिका प्रशासनाने जूनच्या पहिल्या आठवड्यात बीड बायपास रोडवर देवळाई ते महानुभाव आश्रमपर्यंत सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे काढली होती. टप्प्या-टप्प्याने उर्वरित रस्ते रुंद करण्याचा प्रशासनाचा विचार होता.

आज पैठण रोडवर कारवाईमुकुंदवाडी येथील घटनेनंतर महापालिकेने युद्धपातळीवर पैठण रोडवर महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी मार्किंग केली. या भागातील बहुतांश मालमत्ताधारकांनी स्वत:हून आपले सामान काढून घेतले. मालमत्ताही काढून घेण्याचे काम केले. सोमवारी सकाळी ९:०० वाजेपासून मनपा आणि पोलिस संयुक्तरीत्या महानुभाव आश्रमपासून कारवाईला सुरुवात करणार आहेत.

पथक, कर्मचारी तेवढेचपैठण रोडवर कारवाई करण्यासाठी ज्या पद्धतीने पथक तयार केले होते. तेच पथक सोमवारी पैठण रोडवर काम करतील. मनपाचे कर्मचारीही तेवढेच राहतील. पोलिस बंदोबस्तही तेवढाच राहणार असल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर