जालन्यात इसमाचा खून
By Admin | Updated: November 24, 2014 00:34 IST2014-11-24T00:16:15+5:302014-11-24T00:34:32+5:30
जालना :शहरातील गरीबशहा बाजार भागात अशोक रामभाऊ वानखेडे (३०) या इसमाचा आरोपींनी खून केला. हा प्रकार रविवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० उघडकीस आला.

जालन्यात इसमाचा खून
जालना :शहरातील गरीबशहा बाजार भागात अशोक रामभाऊ वानखेडे (३०) या इसमाचा आरोपींनी खून केला. हा प्रकार रविवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० उघडकीस आला.
मयताचा भाऊ किशोर रामभाऊ वानखेडे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. गरीबशहा बाजार भागातील जुना बसथांबा भागात एका युवकाचा खून करण्यात आल्याची खबर शहरभर पसरली. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना काही जणांनी दुरध्वनीवरून ही खबर पहाटे दिली. त्याबरोबर सदर बाजार पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नातेवार्इंकाना बोलावून या घटनेची माहिती दिली. किशोर वानखेडे यांनी पोलिसांना सांगितले, सदर इसम हा आपला भाऊ असून तो भुरट्या चोऱ्या करीत होता.
शिवाय दारू पिण्याची त्याला सवय होता. सदर बाजार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती जमादार शेख जलील यांनी दिली.
अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत असल्याचे ठाणे अंमलदारांनी सांगितले. (वार्ताहर)