हिंगोलीवर पावसाचा रूसवा कायम

By Admin | Updated: July 30, 2014 01:03 IST2014-07-30T00:05:15+5:302014-07-30T01:03:20+5:30

हिंगोली : मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असताना हिंगोलीत मात्र पावसाचा रूसवा गेलेला नाही.

Hingoli's rainy season continued | हिंगोलीवर पावसाचा रूसवा कायम

हिंगोलीवर पावसाचा रूसवा कायम

हिंगोली : मराठवाड्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असताना हिंगोलीत मात्र पावसाचा रूसवा गेलेला नाही. परिणामी पावसात आघाडीवर राहणारा हिंगोली जिल्हा यंदा पिछाडीवर गेल्याने केवळ १३ टक्के पाऊस झाला. आजघडीला ४१३ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना केवळ ११६ मिमी पाऊस झाला. आता रास्त सुगीची आशा उरली नसताना खरीपाची पिकेही कडक उन्हामुळे वाळू लागली.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी ८९२ मिमी पाऊस पडतो. मागील वर्षी १ हजार ४०० मि.मी. पाऊस झाला होता. यंदा गतवर्षी एवढा पाऊस अपेक्षित नसला तरी वार्षिक सरासरी गाठण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र म्रगाप्रमाणे आर्द्राही कोरड्या गेल्या. तोपर्यंत सर्वच जिल्ह्यात पाऊस झाला. बरोबर १२ जुलै रोजी महिन्याच्या उशिराने पावसाचे आगमन झाले.
संपूर्ण आर्द्राने दिलासा दिल्याने दीड महिन्यांच्या उशिराने पेरण्या झाल्या. नंतर पुनर्वसू नक्षत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. पुष्य नक्षत्राची सुरूवात कडक उन्हाने झाली. मेंढा वाहन असलेल्या या नक्षत्राचा शेवट २ आॅगस्ट रोजी होईल. दिवसेंदिवस कडक ऊन पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला.
आजघडीला ४१३ मिमी सरासरी अपेक्षित असताना ११६ मिमी पाऊस झाला. गतवर्षी ६८७ मिमी पावसाने मराठवाड्यात आघाडीवर होता. उलट सरासरीच्या बाबतीत हिंगोली पिछाडीवर आहे. औरंगाबाद, लातूर आणि उस्मानाबादेत चांगला पाऊस झाला.
अद्यापही धूळ उडत असल्याने ३ आॅगस्ट रोजी येणाऱ्या आश्लेषा नक्षत्रावर आशा एकवटल्या. आता मूग, उडदाच्या दाळही मिळणे दुरापास्त होण्याची शक्यता वाटते. आर्थिक गणित अवलंबून असलेले सोयाबीन, कापसाच्या उत्पन्नात घट होईल. म्हणून सर्वत्र पावसासाठी पूजाविधी केला जात आहे. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय सरासरी (मिमी)
तालुका गतवर्षी यंदा
हिंगोली७२२.६९ ८४.०१
कळमनुरी६३६.०४१०९.०२
वसमत ६२५.२८१०८.१४
सेनगाव६३७.०८११६.६४
औंढा८१६.६२१६३
एकूण६८७.५६१०१.८७
जिल्हानिहाय पडलेला पाऊस व टक्केवारी (मिमी)
जिल्हा सरासरीअपेक्षित पडलेला टक्केवारीगतवर्षीचा
औरंगाबाद ६७५.४५२८९.७२ १५२.९९२२.६५३२८.११
जालना ६८८.३२३००.६९ १०४.१५१५.१३४१९.२६
परभणी ७७४.५९३२६.३६ ११०.७३१४.०३४६१.२८
हिंगोली ८९२.७६४१३.३५ ११६.०४१३.०४६८७.५६
नांदेड ९५५.५५४२४.३४ १२०.४९१२.६१५९९.७७
बीड ६६६.६७२७९.०६ १२७.२९१९.१८३४७.६२
लातूर ८०२.१३३२९.७१ १७०.५८२१.२७४४८.८२
उस्मानाबाद ७७६.८३२९४.८९ १४७.६२१९.००३१४.०२
एकूण ७७९३३२.३३ १३४.३४१६.९१४५०.८३

Web Title: Hingoli's rainy season continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.