शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीकरांना डेंग्यूची धास्ती

By admin | Updated: November 8, 2014 23:39 IST

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

हिंगोली : शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शासकीय यंत्रणा तो डेंग्यू नसल्याचे तर खाजगी रुग्णालये तो डेंग्यूच असल्याचे सांगतात. त्यामुळे साधा ताप आला तरी लोक धास्तीने रुग्णालय गाठत आहेत. त्यात अनेकजण नाहक खर्चाने हैराण आहेत. बदललेले वातावरण व डासांचा प्रादुर्भाव यात भर पाडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.यावर्षी अल्पपर्जन्यामुळे दिवसा कडक ऊ न व रात्री थंडी असे विचित्र वातावरण अनुभवायला येत आहे. त्यातच पाणीटंचाईची चाहूलही अनेक ठिकाणी लागत आहे. त्यामुळे घरात पाण्याची साठवणूक करावी लागते. मात्र कोरडा दिवस पाळायला कोणीही तयार नाही. त्यामुळे जिल्हा डेंग्यूच्या छायेखाली असतानाही त्याचे गांभीर्य कोणालाही नसल्याचे दिसते. आरोग्य यंत्रणाही जेथे साथ उद्भवली तेथेच मलमपट्टी करीत आहे. तर जि.प., नगरपालिका, ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छता व जनजागरण ही आपली जबाबदारी आहे, असे वाटतच नाही. शिवाय रुग्ण हिवतापाचा की डेंग्यूचा याचे निदानही लवकर होत नाही. या चक्रव्यूहात अडकलेली सामान्य जनता डेंग्यूच्या विळख्यात सापडत आहे. हिंगोली शहराचा विचार केला तर स्वच्छता नियमित होणे शक्यच नाही. कारण पालिकेकडेच तेवढी यंत्रणा नाही. पाणीही तीन ते चार दिवसाआड मिळते. डासांचा प्रादुर्भावही आहे. अधूनमधून धूरफवारणी होते. हिवताप व तापाचेही रुग्ण आढळले तरी खाजगीचा रस्ता धरतात. आरोग्य विभाग गाफिलच राहतो. उपायही सुचविले जात नाहीत. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. रुग्ण आढळल्यावरच धावपळ होते. ग्रामपंचायती स्वच्छता व पाण्याकडे लक्ष देत नाहीत. आरोग्य विभागही सतर्कतेसाठी प्रयत्न करीत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)