हिंगोलीत मिरवणूक

By Admin | Updated: September 27, 2014 00:53 IST2014-09-27T00:25:13+5:302014-09-27T00:53:49+5:30

हिंगोली : हनुमानाच्या मिरवणुकीनंतर मूर्तीचे महंत कमलदास महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

Hingoli procession | हिंगोलीत मिरवणूक

हिंगोलीत मिरवणूक

हिंगोली : शहरात २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दसरानिमित्त श्री हनुमानाच्या मिरवणुकीनंतर मूर्तीचे महंत कमलदास महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी राधेशाम बोरा, ओमप्रकाश बियाणी, राजू उपाध्ये, शांतीलाल जैन, बिहारीलाल चौधरी, नागोराव लोखंडे, नारायण बांगर, विजय मोकाटे, कानोजी जाधव, संजय चव्हाण, किसन पातळे, गोपीचंद महाराज, त्रिबकेश्वर महाराज, गजानन जाधव, पंडित चिवडे, वैजनाथ कामखेडे, गंगाराम बेंगाळ, अरुण कुरवाडे, विश्राम पवार, बबन गंगावणे, बालाजी जाधव, आंबादास कावरखे, अशोक डुकरे, लक्ष्मण जाधव, दाजिबा जाधव यांच्यासह ३३ भजनी मंडळींची उपस्थिती होती. यानंतर शहरातून हत्ती, घोडे व हनुमानाच्या मुर्तीसह कुंडलिकराव भडाने, विश्वास नायक, राजू उपाध्ये व पुरूषोत्तम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. टाळमृदंग व विणेकरांच्या भजनाच्या गजराने शहर दुमदुमुन गेले. ठिकठिकाणी रांगोळी काढून हनुमानाच्या मूर्तीची पुजाअर्चा करण्यात आली. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीतील भजनी व भाविकांना अल्पोपाहार कार्यक्रम झाला. यासाठी सुनील अग्रवाल, संदेश साहू, रमेश साहू, मुन्नालाल प्रजापती, संदीप साहू यांच्यासह नवयुवकांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Hingoli procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.