हिंगोलीत अहिंसा संघाच्या प्रेरणा महासभेचा समारोप
By Admin | Updated: July 27, 2014 01:17 IST2014-07-26T23:34:31+5:302014-07-27T01:17:08+5:30
हिंगोली : मुंबई येथील अहिंसा संघाच्या वतीने हिंगोली शहरात घेण्यात आलेल्या प्रेरणा महासभेचा समारोप झाला.

हिंगोलीत अहिंसा संघाच्या प्रेरणा महासभेचा समारोप
हिंगोली : मुंबई येथील अहिंसा संघाच्या वतीने हिंगोली शहरात घेण्यात आलेल्या प्रेरणा महासभेचा समारोप झाला. प.पू. लोकेश चैतन्य स्वामी यांनी गीतेचे पूजन करून कार्यक्रमास सुरूवात केली. तर संगीतकार विनित गोमावत यांच्या संघाने भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीपल्स बँकेचे अध्यक्ष सुनील देवडा होते. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष इंदरचंद सोनी, राम कयाल, जेठाचंद नैनवाणी, डॉ. मुरलीधर तोष्णीवाल, लक्ष्मीकांत शिराडकर, अॅड. राजेश बियाणी, कन्हैय्यालाल नैनवाणी, हरिराम वर्मा, मुन्नालाल प्रजापती, शिवा महाराज, बबन महाराज घुगे, माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा, नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, उपनगराध्यक्ष जगजितराज खुराणा, रमेशचंद बगडिया आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कत्तलखान्याविरोधात जनजागृती करणारा माहितीपट दाखविण्यात आला. तसेच प.पु. विराग सागर,विनम्र सागर यांचे प्रवचन ऐकविण्यात आले. कार्यक्रमात कत्तलखान्यात जाणाऱ्या गाई वाचविल्याबद्दल राजेश सांगळे, राजाभाऊ मुसळे यांचा सत्कार करण्याात आला. तसेच मांसाने भरलेला ट्रक पकडल्याबद्दल पोलिसांसह विशाल अग्रवाल, कमलकिशोर सोनी, गंगाधर उंबारे, गौतम दात्तार, महेश्वर चौंढेकर, रेशमाजी खराटे, हेमराज सोनी, चंदादेवी सोनी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पारसमल मोतीलाल, बंडू पाटील, किशोर नभीराज यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाशचंद सोनी, राजकुमार बडजाते, मनोज जैन, दीपक सावजी, रविकुमार कान्हेड, रत्नाकर महाजन, सुरेशचंद संचेती, प्रशांत बगडिया, डॉ. प्रेमेंद्र बोथरा आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)