डिग्री कॉलेजमध्ये हिंदी पंधरवडा
By Admin | Updated: October 1, 2014 00:28 IST2014-09-30T23:41:38+5:302014-10-01T00:28:00+5:30
हिंगोली : शहरातील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

डिग्री कॉलेजमध्ये हिंदी पंधरवडा
हिंगोली : शहरातील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये हिंदी पंधरवड्यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
वक्तृत्व स्पर्धेत प्रियंका बगडिया (प्रथम) अझहर पठाण (द्वितीय) विक्रांत सिरामे (तृतीय) तर निबंध स्पर्धेत अभिषेक अग्रवाल (प्रथम) रेणूका सिरसाट (द्वितीय) फरहान शेख (तृतीय) प्रश्नमंजुषामध्ये विजय धांडे, नुमान पठाण, अलका वाढेकर, प्रांजली मुळे, सीमा वाढवे, विशाल धुळे, धीरज जायले, मसाराम पोले यांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षक म्हणून प्रा. शुभांगी सिरसाट, प्रा. लक्ष्मी गलांडे, प्रा. नम्रता पांडे, प्रा. सोनटक्के यांनी काम पाहिले. यावेळी प्राचार्य दीपक सावळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. माधुरी सोनटक्के यांनी हिंदी दिनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात प्राध्यापक डॉ. अनिल खंदारे यांचा संशोधन कार्याबद्दल प्राचार्य सावळकर, प्रा. मुरलीधर शिंदे, डॉ. निरपल, प्रा. मुपकलवार यांनी सत्कार केला.
सूत्रसंचालन पल्लवी माळगे यांनी मानले. तर कोमल कपाळे यांनी आभार आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रा. जाधव, धांडे, फुलारी, कोटकर, नेवरकर, देशमाने, इंगळे, खंदारे, दुबे, जैस्वाल, शेख, कोंडावार यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)