जगदंबा देवीच्या डोंगरावर भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: December 29, 2016 23:59 IST2016-12-29T23:06:45+5:302016-12-29T23:59:48+5:30
उमरगा : तालुक्यातील नाईचाकूर भगतवाडी येथील जगदंबा देवीच्या यात्रेस आजपासून प्रारंभ झाला

जगदंबा देवीच्या डोंगरावर भाविकांची मांदियाळी
उमरगा : तालुक्यातील नाईचाकूर भगतवाडी येथील जगदंबा देवीच्या यात्रेस आजपासून प्रारंभ झाला असून, आंध्र, कर्नाटक सीमावर्ती भागातील लाखो भाविकांनी गुरुवारी देवी दर्शनासाठी गर्दी केली होती.
तालुक्यातील भगतवाडी-नाईचाकूर या जगदंबा देवस्थानात शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. प्राचीन काळापासून भगतवाडी गावाशेजारी असलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरावर नाईचाकूर मंदिर ट्रस्टच्या पुढाकारातून भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकसह आंध्र प्रदेशातील हजारो देवी भक्तांची श्रद्धास्थान असलेली जगदंबा देवी हे हजारो भाविकांचे कुलदैवत असल्याने या देवस्थानावर दरवर्षी वेळअमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा भरविण्यात येते. नव्यानेच तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत सभा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.