महामार्ग पोलिसांची शहर हद्दीत घुसखोरी
By Admin | Updated: February 22, 2016 00:22 IST2016-02-22T00:22:49+5:302016-02-22T00:22:49+5:30
जालना : महामार्ग पोलिसांनी शहराच्या बाहेरच वाहन तपासणी करावी असा नियम असल्याचे बोलले जाते. मात्र महामार्ग पोलिस चक्क शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करताना दिसून आले.

महामार्ग पोलिसांची शहर हद्दीत घुसखोरी
जालना : महामार्ग पोलिसांनी शहराच्या बाहेरच वाहन तपासणी करावी असा नियम असल्याचे बोलले जाते. मात्र महामार्ग पोलिस चक्क शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करताना दिसून आले. लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हे उघड झाले आहे.
महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा म्हणून महामार्गावर गस्त घालणे, अपघातस्थळी जावून जखमींना मदत करणे, महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविणे, तसेच ओव्हर लोड वाहनांची तपासणी करणे, त्यांच्यावर कारवाई करणे, महामार्गावरील हॉटेल धाबे, पेट्रोलपंपाची तपासणी करून दहशतवादी कृत्यास आळा बसविणे आदी विविध ध्येय व उद्देशांसाठी महामार्ग पोलिसांचे कार्य आहे. त्यासाठी त्यांना कार्यक्षेत्रही ठरवून दिलेले आहे.
जालन्यातील महामार्ग पोलिसांना मात्र ठरवून दिलेल्या पॉर्इंटवर व महामार्गावर वाहनांची तपासणी न करता थेट जालना शहराच्या हद्दीत घुसखोरी करून वाहन तपासणी करतांना दिसून येत आहे. शहरातील नवीन मोंढ्यासमोरच महामार्ग पोलिसांनी आपले बस्तान मांडले आहे. या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या ट्रक चालकांना थांबवून त्यांच्या जवळील कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. त्यातील काही ट्रक चालकांकडून नियमाप्रमाणे दंडाची पावतीही फाडतात. मात्र बहुतांश वाहने ही कागदपत्र व प्रत्यक्ष तपासणी न करताच सोडून दिल्याचे दिसून आले. दरम्यान, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक निकम यांच्याशी या संदर्भात प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.