तोलाईत वाढीसाठी हमाल मापाडींचा संप
By Admin | Updated: July 3, 2017 00:59 IST2017-07-03T00:58:14+5:302017-07-03T00:59:18+5:30
जालना : हमाली आणि तोलाईत सध्या मिळत असलेल्या दरापेक्षा दुपटीने वाट करण्यात यावी या मागणीसाठी हमाल मापाडींनी शनिवार पासून बेमुदत संप सुरु केला आहे.

तोलाईत वाढीसाठी हमाल मापाडींचा संप
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमाली आणि तोलाईत सध्या मिळत असलेल्या दरापेक्षा दुपटीने वाट करण्यात यावी या मागणीसाठी हमाल मापाडींनी शनिवार पासून बेमुदत संप सुरु केला आहे.
१०० किलो पोत्याच्या ऐवजी ५० किलो मध्येच वजनमाप करण्यात यावे जेणेकरून वजन उचलणाऱ्यांच्या शारीरिक हानी होणार नाही. यामुळे सुप्रीम कोर्टाने याबाबत १०० किलो ऐवजी ५० किलो मध्येच वजनमाप करण्याचे आदेश दिले होते. याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पणन महासंघाने राज्यातील बाजार समित्यांना दिले होते. त्यामुळे जालना बाजार समितीमध्ये याची अंमलबजाची करण्यात सुरूवात करण्यात आली होती. सध्या साडेसात रूपये प्रतिक्विंटल हमाली अडीच रूपये तोलाई आणि ३० टक्के लेव्ही असे सोडेबारा रूपये हमाल मापाड्यांना देण्यात येते. मात्र सध्या देण्यात येत असलेल्याा हमाली आणि तोलाईचे दर परवडणारे नसल्याने यात दुपटीने वाढ करण्याची हमाल मापाडी संघनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सहा महिन्यापूर्वीच हे दर वाढविण्यात आले आहे. आत्ता दरवाढ करणे शक्य नसल्याचे बाजार समितीचे वतीने सांगण्यात येत आहे.