शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:15 IST

पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी; विशेष पथक नेमून तपास करण्याचे पोलिस अधीक्षकांना आदेश

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला व मुलांचा शोध लागत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करून बीडचे पोलिस अधीक्षक यांना ‘विशेष पथक’ नेमून याचिकाकर्त्यांसह सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे ११ जुलै २०२५ रोजी आदेशित केले आहे.

बेपत्ता असलेल्या ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) आणि एक महिला व तिच्या २ बालकांचा शोध घेण्याबाबत दाखल स्वतंत्र फौजदारी याचिकांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात बेपत्ता महिला आणि मुलांचे प्रमाण जादा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. या याचिकेवर ८ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ‘बेपत्ता मुले व महिलांचा शोध घेऊन त्यांना संरक्षण देणे. आवश्यकता असल्यास सुरक्षित स्थळी आसरा देणे’ हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे शहाजी जगताप विरुद्ध महाराष्ट्र राज्य या जनहित याचिकेतील आदेशात म्हटल्याचा संदर्भ देत खंडपीठाने बीड पोलिसांना नेमका ‘या कर्तव्याचा’च विसर पडल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

काय आहे याचिका ?बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढेकणमोह येथील ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) हा बेपत्ता झाल्याबद्दल त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिस व्यवस्थित तपास करत नसल्यामुळे त्यांनी ॲड. महेंद्र गंडले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी ओमकारचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही, असा अहवाल खंडपीठात सादर केला. या अहवालावरून पोलिसांनी ओमकारचा शोध घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नसल्याचे दिसते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

असे नेमावे पथकपोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, हेडकॉन्स्टेबल आणि काॅन्स्टेबल अशा विविध पदांच्या किमान ५ जणांचे विशेष पथक नेमून वरील २ याचिकेतील बेपत्ता व्यक्तींसह बीड जिल्ह्यातील सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे पथक तज्ज्ञांचीही मदत घेऊ शकेल, असे स्पष्ट करून ‘अशा कामाबद्दल ज्यांना आस्था नाही, अशांकडे हे काम सोपवू इच्छित नसल्याचे’ म्हणत खंडपीठाने बीड पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर