आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत
By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:24+5:302020-12-04T04:10:24+5:30
अंजनडोहचे तरुण शेतकरी श्रीमंत उत्तम शिंगारे यांनी १८ ऑगस्ट रोजी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत
अंजनडोहचे तरुण शेतकरी श्रीमंत उत्तम शिंगारे यांनी १८ ऑगस्ट रोजी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. गुरुवारी शासनातर्फे औरंगाबाद तहसील कार्यालयात श्रीमंत शिंगारे यांची पत्नी मंगल सिंगारे यांना तहसीलदार खटावकर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी माजी पं.स. सभापती मनोहर शेजूळ, भाऊ पठाडे, बाबासाहेब मोकळे आदींची उपस्थिती होती.
फोटो कॕॅप्शन : अंजनडोह येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला शासकीय मदत देताना तहसीलदार खटावकर, माजी. पं. स. सभापती मनोहर शेजूळ आदी.