संत सावता महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात
By Admin | Updated: July 26, 2014 01:10 IST2014-07-26T00:53:57+5:302014-07-26T01:10:36+5:30
औरंगाबाद : संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सावता मंदिर औरंगपुरा येथून सकाळी मिरवणूक निघाली.
संत सावता महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात
औरंगाबाद : संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सावता मंदिर औरंगपुरा येथून सकाळी मिरवणूक निघाली. सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती, अतुल सावे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे, नगरसेवक अनिल मकरिये, गोपाल कुलकर्णी, प्रीती तोतला, कचरू घोडके, सचिन खैरे, डॉ. राजेंद्र धनवई, डॉ. अशोक शेरकर, डॉ. संजय गव्हाणे यांची उपस्थिती होती.
औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक भाजीमंडी मार्केट, रंगारगल्ली, सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी मार्गे जाऊन संत सावता मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. मिरवणुकीमध्ये तरुण विविध संदेश देणारे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. पालखी विर्सजनानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विविध भजनी मंडळे सहभागी झाली होती. मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ पेरकर, बाबूराव पुंड, पांडुरंग जमदाडे, राम मगर, शशिकला खोबरे, किशोर पुंड, कुसुम राऊत यांनी परिश्रम घेतले.
मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. विविध वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती. गुलमंडी येथे मिरवणुकीवर किशोर शेवाळे यांच्यातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली.
संत सावता महाराजांच्या जन्मस्थानास तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळावा, अशी मागणी माळी समाजाच्या वतीने केली.
यावेळी राधाकि सन शेवाळे, जयराम साळुंके, फकिरा राऊत, मनोज घोडके, निशांत पवार, सुरेखा राऊत, अनिता देवतकर, सुवर्णा जेजूरकर, अनिता गायकवाड, तनुजा जाधव यांची उपस्थिती होती.