भावाच्या मदतीने पतीस पेटविले

By Admin | Updated: September 14, 2015 00:46 IST2015-09-14T00:46:52+5:302015-09-14T00:46:52+5:30

तामलवाडी : ‘तू माझ्या बहिणीला मारहाण का करतोस’ अशी कुरापत काढून पत्नी व तिच्या भावाने नवऱ्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देवून पसार झाले.

With the help of his brother, the husband started pushing | भावाच्या मदतीने पतीस पेटविले

भावाच्या मदतीने पतीस पेटविले


तामलवाडी : ‘तू माझ्या बहिणीला मारहाण का करतोस’ अशी कुरापत काढून पत्नी व तिच्या भावाने नवऱ्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देवून पसार झाले. यामध्ये ३५ वर्षीय पती भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथे १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली. जखमीच्या जबाबानंतर तामलवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी दोघांविरूद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १० सप्टेंबर रोजी यातील जखमी राजेंद्र कच्चू वडवराव (वय ३५) हा घरासमोर बसला असता, बायकोचा भाऊ तिथे आला. ‘तू माझ्या माझ्या बहिणीला का मारतोस व सतत मारहाण का करतोस’ असे विचारून विटाने मारहाण केली. त्यानंतर राजेंद्रची पत्नी वर्षा हिने घरातील रॉकेलची कॅन आणली व ती भाऊ जगन शेरखाने याच्या हातात दिली. वर्षा हिच्या आदेशानंतर जगनने राजेंद्रच्या अंगावर रॉकेला टाकून त्याला पेटवून दिले. यात तो भाजला आहे. घटनास्थळावरून दोघे बहिण-भाऊ पसार झाले. या घटनेनी माहिती मिळताच जखमीची बहिण शितल कांबळे व इतरांनी शाल टाकून राजेंद्रला विझविले. जखमी राजेंद्रवर प्रथम तुळजापूर रुग्णायात उपचार केले. नंतर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी जखमी राजेंद्र वडवराव (रा. मसला खु.) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वर्षा (पत्नी) व तिचा भाऊ जगन अण्णा शेरखाने (रा. राळेरास, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ अन्वये शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास सपोनि मिर्झा बेग करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: With the help of his brother, the husband started pushing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.