‘वनकाठी’ सहाय्याने देवळीत शंभर एकरवर बिजारोपण
By Admin | Updated: August 7, 2014 01:46 IST2014-08-07T00:48:59+5:302014-08-07T01:46:40+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली जवळील डोंगरावर शंभर एकर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान व छत्रपती वनश्री पुरस्कार प्राप्त बलभीम डोके यांच्या सहकार्याने ‘

‘वनकाठी’ सहाय्याने देवळीत शंभर एकरवर बिजारोपण
कडा : आष्टी तालुक्यातील देवळाली जवळील डोंगरावर शंभर एकर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान व छत्रपती वनश्री पुरस्कार प्राप्त बलभीम डोके यांच्या सहकार्याने ‘वनकाठी’च्या सहाय्याने बिजारोपण करण्यात आले.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश शासनासह सर्वांकडूनच देण्यात येतो. तालुक्यातील देवळाली येथील डोंगरपरिसरात गेल्या काही दिवसांपासून वृक्षांची संख्या कमी झाली आहे. यामुळे या परिसरात बिजरोपण करण्याचा निर्णय बलभीम डोके यांच्यासह ग्रामस्थांनी घेतला. यानंतर येथे बुधवारी वनकाठीच्या सहाय्याने बिजरोपण करण्यात आले. कुऱ्हाड बंदी, चराई बंदीचा निर्णयही यावेळी ग्रामस्थांनी घेतला. वृक्ष जोपासण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी बलभीम डोके यांनी केले. यावेळी दिनकर तांदळे, बापुराव धोंडे, महादेव वायभस, के. आर. तांदळे, दत्तात्रय खाडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)