१ मे पासून हेल्मेटसक्ती

By Admin | Updated: March 28, 2016 00:22 IST2016-03-27T23:51:34+5:302016-03-28T00:22:34+5:30

संजय तिपाले , बीड वाढत्या अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी १ फेबु्रवारीपासून औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती लागू केली होती. त्या पाठोपाठ जिल्ह्यातही याची काटेकोर अमंलबजावणी केली जाणार असून,

Helmets from May 1 | १ मे पासून हेल्मेटसक्ती

१ मे पासून हेल्मेटसक्ती


संजय तिपाले , बीड
वाढत्या अपघातांना ‘ब्रेक’ लावण्यासाठी १ फेबु्रवारीपासून औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्ती लागू केली होती. त्या पाठोपाठ जिल्ह्यातही याची काटेकोर अमंलबजावणी केली जाणार असून, त्यासाठी १ मे चा मुहूर्त ठरला आहे. हेल्मेटबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पोलिसांतर्फे लवकरच विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात दरवर्षी अपघातामुळे बळी पडणाऱ्यांची संख्या साडेतीनशे ते चारशे इतकी आहे. गतवर्षी अवैध वाहतुकीसह नियम डावलणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवायांचा बडगा उगारला. त्यामुळे २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये ४२ अपघातबळी कमी करण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबादमध्ये हेल्मेटसक्तीमुळे चांगले परिणाम पुढे आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू पडलेल्यांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचे निष्पन्न झाले. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अपघातीमृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना सूचवितानाच हेल्मेटसक्तीकडेही लक्ष वेधले. त्यानुसार महाराष्ट्र दिनी १ मे पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ व कल्याण विशाखापट्टणम् महामार्ग क्र. २२२ या दोन महामार्गांसह बीड - अहमदनगर व केज- कळंब राज्य रस्त्यांवर ही सक्ती लागू असेल. दुचाकीवर पाठमागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालावे लागणार आहे.
दरम्यान, शहरात वाहतूक पोलीस थांबत असलेल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी (पॉइंट) दंड आकारला जाईल. महामार्गांवर देखील पोलीस निगराणी ठेवतील.
हेल्मटविक्रेत्यांना सुगीचे दिवस
१ मे पासून हेल्मटे सक्ती लागू होणार असल्यामुळे हेल्मेट विक्रेत्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. ४०० पासून ते तीन हजार रूपयापर्यंतचे हेल्मेट उपलब्ध आहेत. काहींकडे आधीच हेल्मेट उपलब्ध आहेत; परंतु ते अडगळीला पडलेले होते. ते देखील आता बाहेर निघणार आहेत.
हेल्मेट न घालता दुचाकी चालविताना आढळल्यास मोटार वाहन कायदा १२९/१७ अन्वये शंभर रुपयांचा दंड भरावा लागेल. जेवढ्या वेळेस दुचाकीस्वार विनाहेल्मेट वाहन चालवित असेल तेवढ्या वेळी त्याला दंड भरावा लागणार आहे.
जिल्ह्यात दुचाकी वाहनांची संख्या दीड लाखांवर आहे. दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालावे लागणार आहे. त्यामुळे तीन लाख हेल्मटेची आवश्यकता बसणार आहे.
४नवीन दुचाकी खरेदी करणाऱ्यांना वाहन विके्रत्यांमार्फतच हेल्मेट देणे बंधनकारक केले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Helmets from May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.