पुन्हा हेल्मेटसक्ती

By Admin | Updated: May 13, 2016 00:10 IST2016-05-12T23:58:50+5:302016-05-13T00:10:24+5:30

औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेशकुमार दीर्घ सुटीवरून बुधवारी परतल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी विनाहेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ‘डार्क फिल्म’वाल्यांना टार्गेट करून तगडी कारवाई केली.

Helmets again | पुन्हा हेल्मेटसक्ती

पुन्हा हेल्मेटसक्ती

औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेशकुमार दीर्घ सुटीवरून बुधवारी परतल्यानंतर गुरुवारी पोलिसांनी विनाहेल्मेट, फॅन्सी नंबर प्लेट आणि ‘डार्क फिल्म’वाल्यांना टार्गेट करून तगडी कारवाई केली. दिवसभरात चक्क तीन हजार २३१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून पोलिसांनी तीन लाख ५४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मध्यंतरी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या रस्त्यावर वाढली होती. पोलिसांनी अचानक कारवाई केल्यामुळे अनेकांना याचा फटका बसला.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार २ मेपासून दहा दिवसांच्या सुटीवर गेले होते. 

Web Title: Helmets again