हॅलो... मी अंगणवाडी सेविका बोलतेय!; २४ एप्रिलपर्यंत ३० हजार मोबाईल होणार ‘अ‍ॅक्टिव्हेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 07:01 PM2019-04-21T19:01:27+5:302019-04-21T19:03:38+5:30

अंगणवाडी सेविकाही आता होणार ‘हायटेक’

Hello ... I'm Aanganwadi sewika speaking !; 30,000 mobile will be activated by April 24 | हॅलो... मी अंगणवाडी सेविका बोलतेय!; २४ एप्रिलपर्यंत ३० हजार मोबाईल होणार ‘अ‍ॅक्टिव्हेट’

हॅलो... मी अंगणवाडी सेविका बोलतेय!; २४ एप्रिलपर्यंत ३० हजार मोबाईल होणार ‘अ‍ॅक्टिव्हेट’

googlenewsNext
ठळक मुद्देमे महिन्यात अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण१६ एप्रिलपासून मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याचे काम सुरु

- विजय सरवदे 

औरंगाबाद  : बालकांच्या दैनंदिन नोंदी, लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी तसेच पोषण आहाराचे वाटप आदींच्या विविध ११ रजिस्टरमध्ये नोंद घेणे व त्यांची देखभाल करण्याच्या कटकटीपासून अंगणवाडी सेविकांची सुटका होणार आहे. १ जूनपासून थेट मोबाईलमध्येच सर्व प्रकारच्या नोंदी घेतल्या जाणार असल्यामुळे अंगणवाडी सेविकाही आता ‘हायटेक’ होणार, असे मानायला हरकत नसावी.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सर्व प्रकारच्या नोंदी घेणारे ‘कॅस’ हे अ‍ॅप व सीमकार्ड तब्बल ३० हजार मोबाईलमध्ये ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. १५ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात जवळपास १५ ते १६ हजार मोबाईल आले आहेत. १६ एप्रिलपासून औरंगाबादेतील १४० व नाशिक जिल्ह्यातून आलेले २० ‘ब्लॉक को-आॅर्डिनेटर’ असे एकूण १६० जण मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्यामध्ये गुंतलेले आहेत. याठिकाणी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांसोबत अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविकांसाठी मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ केले जाणार आहेत. शनिवारपर्यंत याठिकाणी ५ हजार मोबाईल परिपूर्ण झाले असून, २४ एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. 

१६ एप्रिलपासून मोबाईल ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याचे काम देवगिरी महाविद्यालयाच्या सभागृहात सुरू होते. शनिवारी ते उद्योजकता विकास विभागाच्या सभागृहात स्थलांतर करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सूपरवायझरना चार टप्यात प्रशिक्षण घेतल्यानंतर या मास्टर ट्रेनरमार्फत सर्व अंगणवाडी सेविकांना मे महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर १ जूनपासून अंगणवाडी सेविका  या मोबाईलवरच नोंदी घेतील.

ऑनलाईन नोंदीमुळे होईल वेळेची बचत 
अंगणवाडी सेविका  दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात. यामध्ये अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन, उंचीच्या नोंदी, लसीकरण आदींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत आहेत. यापुढे  अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिला जाणार असून, त्याद्वारे सर्व दैनंदिन नोंदी व कामांचा आढावा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.

मे महिन्यात अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण
‘कॅस’ सॉफ्टवेअर अर्थात ‘अ‍ॅप’ तसेच सीमकार्ड ‘अ‍ॅक्टिव्हेट’ करण्याची प्रक्रिया २४ एप्रिलपर्यंत चालेल. रोजच्या रोज त्या- त्या जिल्ह्यांना मोबाईल अपडेट करून पाठविले जातील. त्यानंतर औरंगाबादेतील साधारणपणे ३ हजार अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले जातील. तत्पूर्वी, ८ ते १२ मेदरम्यान चार सत्रांत अंगणवाडी सुपरवायझरला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या सुपरवायझरमार्फत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये रोजच्या रोज नोंदी कशा घ्यायच्या, याचे प्रशिक्षण दिले जाईल. साधारणपणे १ जूनपासून अंगणवाडी सेविका रजिस्टरऐवजी मोबाईलमध्येच सर्व प्रकारच्या दैनंदिन नोंदी घेतील.
- प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Hello ... I'm Aanganwadi sewika speaking !; 30,000 mobile will be activated by April 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.