यलो डोअरच्या वतीने बालके, पालकांसाठी अभिनव उपक्रम
By Admin | Updated: July 21, 2016 01:21 IST2016-07-20T23:58:36+5:302016-07-21T01:21:41+5:30
औरंगाबाद : हसत खेळत गणित शिकण्याच्या मलेशियाच्या ‘आय-मॅथ’ या अभिनव पद्धतीचा अनुभव उत्साही बालके आणि त्यांच्या पालकांनी यलो डोअरच्या नंबर कार्निव्हलमध्ये रविवारी घेतला.

यलो डोअरच्या वतीने बालके, पालकांसाठी अभिनव उपक्रम
औरंगाबाद : हसत खेळत गणित शिकण्याच्या मलेशियाच्या ‘आय-मॅथ’ या अभिनव पद्धतीचा अनुभव उत्साही बालके आणि त्यांच्या पालकांनी यलो डोअरच्या नंबर कार्निव्हलमध्ये रविवारी घेतला. या अभिनव पद्धतीमुळे बालकांची तार्किक दृष्टी विकसित होते. त्यानंतर पालकांना ‘पास्कल्स ट्रँगल’ सारखा अवघड प्रकार क्षणार्धात सोडविण्याचे ‘आय-मॅथ’ पद्धतीने शिकविण्यात आले.
बालकांनी प्रशिक्षणाचा आनंद लुटत रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या कारचे बंपर पुरस्कार जिंकले. ज्या बालकांनी कधीही ‘सुडोकू’ खेळले नव्हते, त्यांनी कठीण स्तरावरील सुडोकू वरील पद्धतीनेच सोडविले. अशा प्रकारचा आनंद यापूर्वी कुठल्याही गणिताच्या वर्गात मिळाला नसल्याचे अनुभव बालकांनी कथन केले. अशा प्रकारे रविवारची सकाळ सकारात्मक कामात व्यतीत केल्यामुळे बालके आणि पालक खुश झाले. जर आपण या संधीचा लाभ घेऊ शकला नसाल तर यलो डोअरला भेट देऊन ३ ते ११ वर्षे वयाच्या बालकांसाठीच्या या क्रांतिकारक अभिनव पद्धतीबद्दल माहिती मिळवा. जेणेकरून आपली बालके गणिताचा तिरस्कार करण्याऐवजी आनंद घेतील, असे आवाहन यलो डोअरतर्फे करण्यात आले आहे.