शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'नमस्कार औरंगाबाद',येत्या काळात गुंतवणुकीसाठी शहरास प्राधान्य,ब्रिटन उपउच्चायुक्तांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 11:51 IST

भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल

औरंगाबाद : औद्योगिक, शैक्षणिक आणि भौतिक सोयी सुविधा औरंगाबादेत चांगल्या आहेत. भविष्यात महत्त्वपूर्ण क्षेत्रात भागीदारीतून गुंतवणूक करण्यास या शहराला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन सोमवारी ब्रिटनचे उपउच्चायुक्त लेन गॅमेल यांनी दिले. शहरातील विकासकामांचा आणि स्मार्ट सिटीने केलेल्या कामाचा आढावा देखील त्यांनी घेतला.

स्मार्ट सिटीच्या मुख्यालयाला गॅमेल यांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीच्या टीमने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या विविध विकासकामांचे सादरीकरण केले. सादरीकरण अत्यंत प्रभावी होते. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा, भौतिक सोयी सुविधांची माहिती देण्यात आली. हे वैभव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी औरंगाबाद शहराचे भरभरून कौतुकही केले.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, रणजित दास, मंजू जिल्ला, भास्कर मुंडे, नताशा कौल वर्मा, मेघना बडजाते, प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र जोशी, ऑरिकचे शैलेश दाभेकर, मासिआचे मनीष अगरवाल, डॉ. मंगला बोरकर, उपायुक्त अपर्णा थेटे, सौरभ जोशी, संतोष टेंगळे, शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.

भागीदारीसाठी औरंगाबाद उत्तमसीआयआयचे राज्य अध्यक्ष श्रीराम नारायणन म्हणाले की, औरंगाबाद हे औद्योगिक गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे शहर आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने येथील उद्योग शिष्टमंडळ ब्रिटनमधील मंडळींना सादरीकरण देऊ शकते. नाथ व्हॅलीचे प्राचार्य रणजित दास यांनी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम परत सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली.

नमस्कार म्हणून जिंकली मने...लेन गॅमेल यांनी प्रारंभीच मराठीत नमस्कार म्हणून उपस्थितांची मने जिंकली. सीईओ पाण्डेय यांना उद्देशून पुढील काही वर्षात किती नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत, असा प्रश्न केला. यावर पांडेय म्हणाले की, जेव्हा जल योजना राबवली जाते, तेव्हा शहराची वाढ आणि विकास होतो. शहरात सध्या नवी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यावर गॅमेल म्हणाले की, औरंगाबादमध्ये उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. ऑटो क्लस्टर, ऑरिक, उद्योग संघटना यासारखे महत्त्वाचे घटक असल्यामुळे महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शिक्षण क्षेत्रात स्कॉटलंड आणि महाराष्ट्र यांच्या भागीदारीचे महत्त्व देखील गॅमेल यांंनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका