हदगावच्या टेलिमेडीसीन सेंटरने ५५० रुग्णांवर केले मोफत उपचार
By Admin | Updated: July 15, 2014 00:56 IST2014-07-15T00:02:04+5:302014-07-15T00:56:35+5:30
हदगाव : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मशीन अंतर्गत हदगाव येथे उभारण्यात आलेल्या टेलिमेडीसीन सेंटरने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन वर्षात ५५० रुग्णांवर उपाचर केले़

हदगावच्या टेलिमेडीसीन सेंटरने ५५० रुग्णांवर केले मोफत उपचार
हदगाव : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मशीन अंतर्गत हदगाव येथे उभारण्यात आलेल्या टेलिमेडीसीन सेंटरने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तीन वर्षात ५५० रुग्णांवर उपाचर केले़ या केंद्राकडे सध्या रुग्णांची संखया वाढल्याची माहिती फॅसिलिट मॅनेजर सुनील तोगरे यांनी दिली़ नांदेड जिल्ह्यातील एकमेव टेलिमेडीसीन सेंटर हदगाव उपजिल्हा रुग्णालय येथे आहे़ या केंद्राची सुरुवात २०११ पासून झाली असून या केंद्रामार्फत रुग्णांवर आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने उपचार करण्यात येतात़ यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्यात येतो़ गोरगरीब जनतेला हा खर्च परवडत नाही व नेमके कोणत्या डॉक्टरकडे जायचे हेही कळत नाही़ येथे रेडिओलॉजी, डोळ्यांचे आजार, सिकलसेल, त्वचारोग, आरबीएसके अंतर्गत शालेय तपासणी आदी रोगावर मोफत उपचार केले जातात़ २०११-१२ मध्ये एकूण रूग्ण ७० वर उपचार केले़ आॅनलाईन ४ व आॅफलाईन ६६ होते़ २०१२-१३ मध्ये एकूण १९८ रुग्णांवर उपचार करण्यात आले़ यामध्ये ३२ आॅनलाईन व १६४ आॅफलाईन रुग्णांवर उपचार केले़ २०१३-१४ मध्ये एकूण ३६० रुग्णांवर उपचार करण्यात आले़ यामध्ये आॅनलाईन ४३ व आॅफलाईन ३१७ रुग्ण होते़ दिवसेंदिवस या केंद्राची मदत घेण्यासाठी रुग्णात वाढ होत आहे़ या सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ परभणी, हिंगोली, पुसद, यवतमाळ आदी ठिकाणावरून रुग्ण येथे येतात़ मराठवाड्यातील हे पहिल्या टप्प्यातील केंद्र असून दुसऱ्या टप्प्यात मुखेड व किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे हे केंद्र सुरू होणार आहेत़ तसा प्राथमिक अहवाल या केंद्रामार्फत पाठविण्यात आल्याची माहिती डॉ़लोमटे व तोगरे यांनी दिली़ (वार्ताहर)