शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

छत्रपती संभाजीनगरात अवजड वाहनामुळे बळी, सिमेंट मिक्सरच्या चाकात अडकून तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:23 IST

अवजड वाहनांबाबत पोलिसांचे 'साेयीस्कररीत्या दुर्लक्ष', नियम नसल्याने सुसाट

छत्रपती संभाजीनगर : बेबंद झालेल्या हायवा, वाळू, सिमेंट मिक्सरने शहरात पुन्हा एक बळी घेतला. सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून सईदा अखील शेख (३२, रा. मुकुंदवाडी) यांचा अंत झाला. मंगळवारी शहानूरमियाँ दर्गा चौकात रात्री ९:३० वाजता हा अपघात झाला.

सईदा गृहिणी होत्या. मंगळवारी सायंकाळी त्या फार्मासिस्ट असलेला मित्र शेख मोहम्मद अझहरसोबत रात्री दुचाकीने शहानूरमियाँ दर्गा परिसरात पाणीपुरी खाण्यासाठी गेल्या होत्या. तेथून ते बीड बायपासच्या दिशेने जात होते. यावेळी दर्गा चौकातून आलेल्या सुसाट सिमेंट मिक्सर हायवाने (एम एच २० -जीझेड - २२९९) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे अझहर यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले व सईदा थेट हायवाच्या चाकाखाली सापडल्या. हायवा चालकाने तरीही हायवा पुढे दामटला. यात सईदा गंभीर जखमी झाल्या. दूर फेकले गेलेले अझहरदेखील जखमी झाले. स्थानिकांनी धाव घेत सईदा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री २ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अझहर यांच्या तक्रारीवरून हायवा चालकाविरोधात जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक अतिश लोहकरे तपास करत आहेत.

टँकरमुळे वृद्धाने पाय गमावलाभरधाव पाण्याच्या टँकरमुळे सोमनाथ जाधव (६०, रा. जयभवानीनगर) यांना उजवा पाय गमवावा लागला. ९ फेब्रुवारी रोजी ते सायंकाळी ७:३० वाजता मुकुंदवाडीतून पायी जात असताना पाण्याचा टँकर विजेच्या खांब्याला धडकून त्यांच्या अंगावर पडला. यात जाधव यांच्या शरीराचा उजवा भाग गंभीर जखमी झाल्याने मांडीपासून कापावा लागला.

सातत्याने मृत्यू, तरीही....२९ जानेवारी रोजी मिनी घाटीसमोर वाळू हायवाखाली चिरडून मालन चौधरी (५०, रा. सुंदरवाडी) यांचा मृत्यू झाला. शहरात नागरी वसाहत, अरुंद रस्त्यांवरून अवजड वाहने सुसाट दामटली जातात. बीड बायपासवरदेखील अशा वाहनांवर कुठलेही निर्बंध नाहीत. परिणामी, एकीकडे नागरिकांचे जीव जात असताना पोलिस मात्र बेजबाबदारपणे दुर्लक्ष करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDeathमृत्यू