शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी; अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 17:51 IST

तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.

ठळक मुद्देअंधारी येथील मोहरा रस्त्यावरील काटवन तलाव तुडुंब  भरला आहे.जास्त पाऊस झाल्याने तो केव्हाही फुटू शकतो..

सिल्लोड: तालुक्यातील अजिंठा, गोळेगाव,आमठाणा, बोरगाव बाजार  या चार मंडळात  सोमवारी रात्री जोरदार अतिवृष्टी झाली यामुळे अजिंठा अंधारी, उंडणगाव, राहिमाबाद येथील तिन्ही मध्यम प्रकल्प ओवरफ्लो झाले. वादळी वारा, व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे पडली, शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले.तालुक्यातील जवळपास सर्व नद्याना पूर आला आहे.अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे.पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.अनेक शेतात पाणी साचले आहे.

सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला व मंगळवारी सुद्धा सकाळपासून सततधार सुरू आहे. सोयाबीन पीक पूर्ण हातचे गेले आहे.कपाशीच्या कैऱ्या सडल्या आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. तालुक्यातील भराडी-अंधारी रस्ता गेल्या चार दिवसांपासून नदीला पूर आल्याने बंद आहे.पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे.लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गुलाब चक्रीवादळाचा फटका, औरंगाबादेत अनेक भागांतील घरांत घुसले पाणी, झाडे उन्मळून पडली

सर्कल निहाय झालेला पाऊस..सिल्लोड तालुक्यात झालेला पाऊस असा:-सिल्लोड ४५, भराडी ६०,अंभई ६३, अजिंठा ८५,गोळेगाव ९२,आमठाणा ६७,निल्लोड ४०,बोरगाव बाजार ६५ असा एकूण सरासरी ६४.६२५ मिलिमीटर पाऊस झाला.

'गंगामाय शांत हो...'; रौद्ररुपी कयाधू नदीची महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी

काटवन तलाव फुटण्याच्या मार्गावर...अंधारी येथील मोहरा रस्त्यावरील काटवन तलाव तुडुंब  भरला आहे. जास्त पाऊस झाल्याने तो केव्हाही फुटू शकतो.. त्यामुळे तलावाकाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तलाव फुटू नये म्हणून  सांडव्यातून जेसीबीने पाणी काढण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासन करत आहे.टाकली ते अंधारी रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील  वाहतूक ठप्प झाली आहे.कन्नड औरंगाबाद बस यामुळे पुढे न जाता अंधारातून परत गेली आहे.

Flood : मांजरा नदी काठावर अडकलेल्या २५ जणांची सुटका; बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरला पाचारण

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद