शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच; ४० मंडळांतील १२०० गावांत जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:10 IST

२८ सप्टेंबरनंतर २८ ऑक्टोबरलाही रात्रीतून दमदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात अतिवृष्टीचे सत्र सुरूच असून, २७ सप्टेंबर रोजी रात्रीतून विभागात १८९ मंडळांतर्गत येणाऱ्या ३८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला. आता २८ ऑक्टोबर म्हणजेच एक महिन्याने रात्रीतूनच विभागातील ५ जिल्ह्यांतील ४० मंडळांत येणाऱ्या १२०० गावांना पावसाने झोडपले. 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला. सप्टेंबरमधील ३० दिवसांमध्ये विभागात ३६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर ऑक्टोबरमधील २८ दिवसांत ८० मि.मी. पाऊस मराठवाड्यात बरसला. मंगळवारी दिवस व रात्रीतून २९ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत विभागात एकूण २४.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ६२.२ मि.मी. पाऊस लातूर जिल्ह्यात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २२ मि.मी., जालना २८, बीड २८, धाराशिव ८, नांदेड ७, परभणी २६ तर हिंगोली जिल्ह्यात ४ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

७ मंडळांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊसमराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात सुमारे १३ दिवसांत ७२५ मंडळांत धुवाधार पाऊस बरसल्यानंतर ऑक्टोबर अखेरीस ४० मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मंगळवार रात्रीतून बुधवारी पहाटेपर्यंत २९ रोजी सकाळपर्यंत ४० पैकी ७ मंडळांत १०० ते १६० मिमीदरम्यान पाऊस झाला आहे. एकूण ८०० गावांच्या हद्दीत हा पाऊस झाला आहे. विभागातील ४०० मंडळे अशी आहेत, ज्यामध्ये मागील दोन महिन्यांत वारंवार पाऊस झाल्याने तेथील खरीप पिकांचा चिखल झाला.

जूनपासून आजवर १३३ टक्के पाऊस...मराठवाड्यात जूनपासून आजवर १३३ टक्के पाऊस झाला आहे. ६७९ मि.मी.च्या तुलनेत १ हजार २९ मि.मी. पाऊस झाला आहे. ३५० मि.मी. अतिरिक्त पाऊस यंदाच्या पावसाळ्यात झाला आहे. पाच जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १ हजार मि.मी.च्या पुढे पाऊस झाला आहे. तर तीन जिल्ह्यात ९५० मि.मी.च्या आसपास पाऊस बरसला.

कोणत्या जिल्ह्यात किती मंडळात अतिवृष्टी?जिल्हा.........................एकूण मंडळेछत्रपती संभाजीनगर.... १जालना................२बीड...............७लातूर..........२८परभणी............२एकूण........४०

दोन महिन्यांतील १४ दिवसांत ७६५ मंडळांत अतिवृष्टीतारीख........अतिवृष्टी...१३ सप्टेंबर.........१९१४ सप्टेंबर..........५३१५ सप्टेंबर..........३२१६ सप्टेंबर...........४११७ सप्टेंबर...........१५१८ सप्टेंबर...........०५१९ सप्टेंबर...........०७२० सप्टेंबर...........१०२१ सप्टेंबर...........०९२२ सप्टेंबर.........७५२३ सप्टेंबर.........१२९२६ सप्टेंबर.........१४१२८ सप्टेंबर.........१८९२८ ऑक्टोबर........४०एकूण.............७६५

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Faces Relentless Rain: 1200 Villages Affected in 40 Regions

Web Summary : Marathwada continues to battle heavy rains, impacting 1200 villages across 40 regions in five districts. Following September's deluge, October brought more rainfall. Latur district recorded the highest rainfall. Since June, the region has received 133% of its average rainfall, causing extensive damage to Kharif crops in many areas.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर