नांदेड शहरात जोरदार पाऊस

By Admin | Updated: July 17, 2017 00:32 IST2017-07-17T00:28:45+5:302017-07-17T00:32:40+5:30

नांदेड: तब्बल वीस दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़

Heavy rain in Nanded city | नांदेड शहरात जोरदार पाऊस

नांदेड शहरात जोरदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: तब्बल वीस दिवस दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ शनिवारी रात्री काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या़ त्यानंतर रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुुरुवात झाली़ काही वेळातच रस्त्यावर पाणी साचले होते़
मृग नक्षत्रात जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने नंतर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते़ सलग वीस दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये दुबार पेरणीचे संकट ओढवले होते़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्यामुळे दिलासा मिळत असला तरी, पावसाचा जोर मात्र कमीच आहे़ शनिवारी रात्री काही तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला़ शहरातही उशिरापर्यंत रिपरिप सुरु होती़ त्यानंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली़ त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते़
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- नांदेड-६़१३, मुदखेड-९़३३, अर्धापूर-५, भोकर-१३़७५, उमरी-१२़३३, कंधार-९, लोहा-८़५०, किनवट-१८़२९, माहूर-४०़५०, हदगांव-१६़४३, हिमायतनगर-१३़३३, देगलूर-१़१७, बिलोली-६़६०, धर्माबाद-८, नायगांव-७़६०, मुखेड-२़५७ मि़मी़पावसाची नोंद झाली़ अद्यापही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़

Web Title: Heavy rain in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.