तडवळ्यात तासभर जोरदार पाऊस
By Admin | Updated: May 7, 2014 00:43 IST2014-05-07T00:43:19+5:302014-05-07T00:43:39+5:30
कसबे तडवळे : तालुक्यातील कसबे तडवळे परिसरात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तब्बल तासभर धो..धो पाऊस झाला.

तडवळ्यात तासभर जोरदार पाऊस
कसबे तडवळे : तालुक्यातील कसबे तडवळे परिसरात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तब्बल तासभर धो..धो पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. काही दिवसांपासून परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वार्यास पावसाला सुरूवात झाली. हा पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता. कसबे तडवळे सोबतच खामगाव, रूई, गोपाळवाडी आणि कोंबडवाडी परिसरातही पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे कळंब तालुक्यातील हावरगाव, हसेगाव (के) आदी भागात मंगळवारी ४ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सुमारे एक तास झालेल्या या पावसामुळे शेतात पाणी साचले होते. या पावसाने शेतातील ताली गच्च भरल्या आहेत. पाण्याअभावी वाळत चाललेल्या उसाला या पावसाने चांगला आधार मिळाल्याने शेतकर्यांतून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) वाशी शहरासह परिसराला अवकाळी पावसाने मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास झोडपले. वादळी वार्यामुळे अनेकांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले. तसेच आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विद्युत वाहक तारा तुटल्या असून खांबही मोडून पडले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.