जिल्ह्यात उष्णतेची लाट कायमच..!
By Admin | Updated: May 21, 2016 23:57 IST2016-05-21T23:40:59+5:302016-05-21T23:57:42+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंश एवढे होते.

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायमच..!
जालना : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४३ अंशांवर स्थिरावत असल्याने सर्व सामान्यांचे उन्हामुळे हाल होत आहेत. शनिवारी तापमान ४१ अंश एवढे होते.
आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. सकाळपासून पारा वाढत असल्याने १२ ते ४ या वेळेत घरा बाहेर पडणे जिकिरीचे बनले आहे. कडक उन्हामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने लहान मुले व वयोवृद्धांना कमलाची त्रास होत आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी घरा बाहेर पडू नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शनिवारी जालनासह अंबड, परतूर, घनसावंगी, भोकरदन, जाफराबाद, मंठा व बदनापूर येथे तापमान ४० ते ४२ अंशांवर गेले होते.