देवयानी डोणगावकर यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST2021-02-05T04:19:29+5:302021-02-05T04:19:29+5:30

निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी ३ जानेवारी रोजीची बैठक स्थगित केली होती. तीच बैठक ४ ...

Hearing on Devyani Dongaonkar's petition tomorrow | देवयानी डोणगावकर यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

देवयानी डोणगावकर यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी

निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी ३ जानेवारी रोजीची बैठक स्थगित केली होती. तीच बैठक ४ जानेवारीला बोलावली होती. या बैठकीला डोणगावकर यांनी आव्हान दिले आहे. गुरुवारी (दि.२८) न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठात याचिकेवर सुनावणी झाली.

३ जानेवारी रोजी झालेली अध्यक्षपदाची निवडणूक देवयानी डोणगावकर, अनुराधा चव्हाण आणि मीना शेळके यांनी लढविली होती. अनुराधा चव्हाण आणि सेनेच्या मोनाली राठोड यांनी हात उंचावून देवयानी डोणगावकर यांना मतदान केले होते. त्यानंतर मोनाली राठोड यांनी मीना शेळके यांनासुद्धा हात उंचावून मतदान केले होते. मीना शेळके यांना २८ मते पडली होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी डोणगावकर यांनाच निवडून आल्याचे घोषित करणे आवश्यक होते. मोनाली यांनी दोन्ही उमेदवारांना केलेले मतदान बाद केले असते तरी डोणगावकर यांना २९ आणि शेळके यांना २८ मते पडली असती आणि डोणगावकरच विजयी झाल्या होत्या, असे डोणगावकर यांचे म्हणणे आहे . डोणगावकर यांच्या वतीने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे, शेळके यांच्या वतीने अ‍ॅड. व्ही. डी. साळुंके तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे पाटील यांनी काम पाहिले.

Web Title: Hearing on Devyani Dongaonkar's petition tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.