आरोग्य कर्मचारी अद्यापही पगाराविनाच
By Admin | Updated: March 19, 2015 00:15 IST2015-03-19T00:04:25+5:302015-03-19T00:15:54+5:30
जालना : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी या नूतन वर्षात अद्यापही पगाराविनाच आहेत. ऐन गुढीपाडव्याचा सणही पगाराविनाच जातो की, काय अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.

आरोग्य कर्मचारी अद्यापही पगाराविनाच
जालना : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील आरोग्य कर्मचारी या नूतन वर्षात अद्यापही पगाराविनाच आहेत. ऐन गुढीपाडव्याचा सणही पगाराविनाच जातो की, काय अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
जिल्हा परिषदेतील आॅनलाईन सेवार्थ प्रणालीद्वारे २०१५ पासूनचे वेतन कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांकडून त्यांच्याविषयीची माहिती वेळेत जमा न झाल्याने हे काम लांबणीवर पडले. हे वेतन आता आॅनलाईन सेवार्थ प्रणालीद्वारे होत आहे. यामध्ये काही विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख म्हणाले, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाची देयके वित्त विभागाकडे पाठविण्यात आलेली आहेत. एक-दोन दिवसात त्यांचे वेतन होईल. कर्मचाऱ्यांमधून रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुदेश वाठोरे म्हणाले, दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. प्रशासनाने वेळेवर वेतन अदा करणे गरजेचे होते. (प्रतिनिधी)